Lok Sabha Constituency Result: ‘ती’ काय आईची शपथ घेणं आहे काय? रवींद्र वायकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडेही मोबाईल होते. मग त्या सर्वांनी मशीन हॅक केली का? १३ दिवसांत मी काम केले.

206
Lok Sabha Constituency Result: 'ती' काय आईची शपथ घेणं आहे काय? रवींद्र वायकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून सध्या वाद सुरू आहेत. त्यातच शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी मंगळवार, (१८ जून) मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधत मतमोजणीदरम्यान १ लाख मतांची मोजणी बाकी असताना विजय कुणी घोषित केले?, असा सवाल उपस्थित केला तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही पलटवार केला आहे. (Lok Sabha Constituency Result)

खासदारकीची शपथ म्हणजे आईची शपथ नाही. रवींद्र वायकर दगाबाजी करून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे खासदारकीची शपथ घेऊ नये, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटले होते. यावर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, “खासदारकीची शपथ म्हणजे ही काही आईची शपथ, वडिलांची शपथ, देवाची शपथ नाही. त्यांनी मोठेपणाने पराभव पचवायला शिकले पाहिजे. मला टार्गेट केले जात आहे. माझ्या विरोधात नकारात्मकता पसरवण्यात आली आहे”, असा आरोप रवींद्र वायकर यांनी केला. (Lok Sabha Constituency Result)

(हेही वाचा – T20 World Cup, Pakistan Exit : पाकिस्तानचा संघ लंडनमध्ये घालवणार सुट्टी)

राज ठाकरेंसोबतची भेट ही सदिच्छा भेट
पुढे रवींद्र वायकर यांनी राज ठाकरेंसोबतची भेट ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंचे सहकार्य लाभले, त्याबाबत भेट घेणं महत्त्वाचे होते, असे रवींद्र वायकर म्हणाले तसेच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. त्यांच्या तेवढ्या जागा आल्या नाही. आरोप करणाऱ्यांनी कोर्टात जावे पुरावा सादर करावा. मोबाईल हा प्रत्येकाकडे असतो. मोबाईल टॉवर चेक केले, तर मतदान केंद्रात त्या दिवशी किती लोकांकडे मोबाईल होते हे कळेल; पण ते हॅक केले जाते हे सिद्ध झाले, तर त्यातून खूप मोठं काही कळू शकते”, असे रवींद्र वायकर म्हणाले.

मी अल्कोहोलिक नाही वर्कहोलिक
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “तिथे मतदान केंद्रावर अनेकांकडे मोबाईल होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडेही मोबाईल होते. मग त्या सर्वांनी मशीन हॅक केली का? १३ दिवसांत मी काम केले. मतदारांच्या आशीर्वादाने मी विजयी झालो. मी वर्कहोलिक आहे. अल्कोहोलिक नाही. माझ्या विरोधात खोटा प्रचार सुरू आहे. त्यांनी कोर्टात जावे, माझं काही म्हणणे नसेल”, असे वायकर म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.