Lok Sabha Election 2024 : राज्यातील २८ छोटी मोठी धरणे कोरडी तरीही प्रचारातून पाण्याचा मुद्दा गायब

Lok Sabha Election 2024 : राज्यात गेल्यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानाचे चटके आता बसू लागले असून, राज्याच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

158
Lok Sabha Election 2024 : राज्यातील २८ छोटी मोठी धरणे कोरडी तरीही प्रचारातून पाण्याचा मुद्दा गायब
Lok Sabha Election 2024 : राज्यातील २८ छोटी मोठी धरणे कोरडी तरीही प्रचारातून पाण्याचा मुद्दा गायब
  • मुंबई प्रतिनिधी 
राज्यात गेल्यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानाचे चटके आता बसू लागले असून, राज्याच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई (water shortage) जाणवू लागली आहे. राज्यातील मोठ्या धरणांपैकी २८ धरणे कोरडी पडली आहेत, तर ७,०७२ गावे-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पुणे विभागात सर्वाधिक पाणीटंचाई (water shortage) निर्माण झाल्याचे दिसत आहे. असे असताना देखील राज्यातील लोकसभेच्या निवडणुकांमधून (Lok Sabha Election 2024) सत्ताधारी असो किंवा विरोधक पाण्याच्या मुद्द्यावरती पाण्यातील “पा” देखील बोलायला तयार नाहीत.सरकारी आकडा पाहिला तर ७,०७२ गावे-वाड्या टँकरग्रस्त आहेत.तरी देखील निवडणुकीत पाणी हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकला नाही. (Lok Sabha Election 2024)
राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,४०० मिलिमीटर आहे. पण राज्यातील एकाही जिल्ह्यात गेल्यावर्षी समाधानकारक किंवा सरासरीइतका पाऊस झालेला नाही. केवळ तीन जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांवर पाऊस झालेला आहे. (Lok Sabha Election 2024)
मराठवाड्‌यात तीव्र टंचाई !
पाणी उपलब्धतेच्या बाबतीत सर्वात चिंताजनक अवस्था मराठवाड्याची आहे. केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे २७ टक्के आणि नाशिक विभागात २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण (Konkan), नागपूर (Nagpur) आणि अमरावती (Amravati) विभागात ३४ ते ४२ टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. (Lok Sabha Election 2024)
कोयना, उजनी, जायकवाडीत कमी पाणी
२३ जिल्ह्यांमध्ये ६० ते ८० टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला आहे. दुष्काळ प्रवण ९ जिल्ह्यांमध्ये ६० ते ७० टक्क्यांच्या आसपासच पाऊस झाला होता. परिणामी, गेल्यावर्षी राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. कोयना, उजनी आणि जायकवाडीसारखी मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकलेली नाहीत. (Lok Sabha Election 2024)
राज्यात कोरडी पडलेली धरणे
कालिसरार, खडकपूर्णा, बोरगाव अंजनपूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, वांगदरी, ढालेगाव, गुंजारगा, किल्लारी, निम्न तेरणा, मदनसुरी, राजेगाव, सिना कोळेगाव, तागरखेडा, बिडगीहाळ, कारसा पोहरेगाव, टाकळगाव देवळा, वांजरखेडा, निम्न दुधना, चणकापूर. (Lok Sabha Election 2024)
राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक भागात पाण्याचे दुर्भिक्ष असताना देखील प्रचारात मात्र राजकारण आणि राजकारणच दिसून येत आहे. पाण्यासारखा मूलभूत प्रश्न मात्र या सर्व प्रचारापासून बराच लांब राहिला आहे ही एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.