Lok Sabha Election 2024: ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार; कारणे वाचा सविस्तर…

263
Lok Sabha Election 2024 : माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराची धामधूम सुरू असतानाच तब्बल ६५ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. निवडणूक आयोगाकडून अधिकाधिक मतदान करण्यासाठी मतदारांना वेळोवेळी आवाहन केलं जातं असून अनेक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. तरीदेखील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ६५ गावांतील मतदारांनी घेतला आहे.

६५ गावांतील ४१ हजार ४४० मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. यामध्ये माढा, आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. रस्ते, पाणी, मराठा आरक्षण, रेल्वेगाडी सुरू करावी, अशा मागण्यांकरिता मतदानावर बहिष्कार टाकण्यात आल्याची कारणे नागरिकांकडून सांगितली जात आहेत. बीड जिल्ह्यातील एका गावाने मोबाईल टॉवरसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचं कारण सांगितलं आहे.

(हेही वाचा – EVM-VVPAT: १००% मते व्हीव्हीपॅट संलग्न ईव्हीएमद्वारे मोजली जावीत, सर्वोच्च न्यायालयाकडून पडताळणीला सहमती)

मोबाईल टॉवरला रेंज नाही…
आष्टी तालुक्यातील सुरूर्डी येथे गेल्या वीस वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भातील ठरावच ग्रामपंचायतीमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आला आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही कोणत्याहीभुयारी मार्गाच्या मागणीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिरुरमधली निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच भुयारी मार्गाच्या मागणीसाठी खोडद, हिवरे, नारायणगाव गावातील 1200 ते 1300 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे टॉवर परिसरात बसवण्यात आलेलं नाहीत. त्यामुळे गावात मोबाईलला रेंज नसल्यानं गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ टॉवर बसवून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत गावात मोबाईलला रेंज मिळत नाही. तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमतानं घेतला आहे.

रस्ते, लाईट पाणी आरोग्य सुविधांचा अभाव
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी रस्ते,पाणी, लाईट आणि आरोग्य या मूलभूत सुविधा नसल्याने फुगाळे आणि दापूर येथील ३ हजार ४६६ मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

पुनर्वसनाच्या मागणीसाठी
ठाणे लोकसभा मतदारसंघात सिडकोनं जमिन अधिग्रहण करूनही काम पूर्ण न केल्यानं जमिन परत करण्याच्या अन्यथा पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी सावली गावातील 15 ते 20 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

रस्त्यांची कामं, जमिनीच्या अधिग्रहणासाठी मतदानावर बहिष्कार
मावळ मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी कोंडीची वाडी येथील 70 ते 80 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर, जमिनीच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी हनुमान कोळीवाडा आणि करंजा गावातील 400 ते 450 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.

इतर कारणे – 

  • मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लाहोरा तालुक्यातील होळी गावातील 500 ते 600 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
  • नदीवरील पूल बांधण्याच्या मागणीसाठी परंडा तालुक्यातील कुंभेफळ गावातील 795 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.