Lok Sabha Election 2024: पक्ष बदलून निवडणूक लढवणारे 66% उमेदवार पराभूत, विजय नोंदवण्यात कोण यशस्वी ? वाचा सविस्तर

168
Lok Sabha Election 2024: पक्ष बदलून निवडणूक लढवणारे 66% उमेदवार पराभूत, विजय नोंदवण्यात कोण यशस्वी ? वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून तिकीट मिळालेल्या ६६% उमेदवारांचा पराभव झाला. संकेत स्पष्ट आहेत की, केवळ तिकीट मिळवण्यासाठी निष्ठा बदलणाऱ्या नेत्यांना जनतेने नाकारले. सर्व पक्षांनी दुसऱ्या पक्षातून सत्तेत आलेल्या १२७ जणांनी उमेदवारी दिली. त्यापैकी केवळ ४८ विजय नोंदवण्यात यशस्वी ठरले, तर ८४ पक्षांतर करणाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय जनता पक्षाने इतर पक्षांतून आलेल्या ५६ जणांना उमेदवारी दिली. यामध्ये फक्त २० जिंकले. ३६ पराभूत झाले. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला उल्लेखनीय यश मिळाले असले तरी इतर पक्षांच्या २९ पैकी केवळ ७ उमेदवार जिंकू शकले. २२ ला पराभवाला सामोरे जावे लागले. बंगालमध्ये मोठा विजय नोंदवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी पक्षबदलाच्या सहा नेत्यांना तिकीट दिले, पण आसनसोलमधून विजयी झालेले शत्रुघ्न सिन्हा वगळता पाचही उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले.

(हेही वाचा – Maldives President Mohamed Muizzu यांनी सलग तिसऱ्या विजयाबद्दल केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!)

४४ जणांनी काँग्रेस सोडली; १२ विजयी
समाजवादी पक्षाने इतर पक्षांतील १८ नेत्यांना उमेदवारी दिली. त्यापैकी १० विजयी झाले. आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) दुसऱ्या पक्षाच्या दाेघांना तिकीट दिले, ते दोघेही विजयी झाले. काँग्रेस सोडून ४४ नेत्यांनी इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यापैकी फक्त १२ जिंकू शकले. तर इतर पक्षांनी भाजपच्या २४ नेत्यांना तिकीट दिले. त्यापैकी फक्त सहा जिंकले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपमधून सपामध्ये गेलेले देवेश शाक्य एटामधून, कृष्णा शिवशंकर पटेल बांदा आणि रमेश बिंद मिर्झापूरमधून विजयी झाले.

जितीन, शत्रुघ्न व जगदीश विजयी, कृपाशंकर व किरणकुमार पराभूत
काँग्रेसमधून भाजपत आलेले: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र जितिन प्रसाद यांना वरुण गांधी यांचे तिकीट कापून पीलीभीतमधून भाजपनेे उमेदवारी दिली. ते मोठ्या फरकाने जिंकले.

जनतेने नाकारले
दुसऱ्यांदा भाजपमध्ये: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये गेले हाेते. निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परतले. बेळगावमधून काँग्रेसच्या मृणाल हेबाळकर यांचा १,७८,४३७ मतांनी पराभव केला.

भाजपा सोडून टीएमसीकडून लढले
शत्रुघ्न शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला. आसनसोलमधून भाजपच्या सुरेंद्रजीत सिंग अहलुवालिया यांचा त्यांनी ५९,५६४ मतांनी पराभव केला.

उत्तर प्रदेशात नाही यश
मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ते यूपीमधील जौनपूरमधून भाजपकडून लढले. पण सपाच्या बाबूसिंह कुशवाह यांच्याकडून पराभूत.
राजमपेटमध्ये पराभव : अविभाजित आंध्रचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी भाजपच्या तिकिटावर राजमपेटमधून लढले. वायएसआरपीच्या पीव्ही मिधुन रेड्डी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.