पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आता खऱ्या अर्थाने देशवासियांचे स्वप्न होऊ लागले आहे. मोदी यांच्या या संकल्पात खारीचा वाटा उचलण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते सरसावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्टीपणा आणि देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प लोकांना किती आवडत आहे हे जाणून घ्यायचे असेल तर भाजपात सामील होणाऱ्या नेत्यांचा ओघ किती जबरदस्त आहे हे बघावे लागेल. (Lok Sabha Election 2024)
देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविणे आवश्यक आहे. म्हणून भाजपाने देशवासीयांसोबतच विरोधी पक्षाच्या नेत्यांना मोदी यांची दूरदृष्टी आणि त्यांचा संकल्प समजावून सांगण्याची मोहीम हाती घेतली गेली. याचा परिणाम असा झाला की आतापर्यंत विरोधी पक्षाचे तब्बल ८० हजार नेत्यांनी भारतीय जनता पक्षांत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एक लाख नेत्यांना भाजपात सामील करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी फक्त २० हजारची संख्या गाठायची आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – IPL 2024, Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव अजूनही मॅच-फिट नाही, हार्दिकची समस्या वाढली)
एक लाख नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचे भाजपाचे उद्दिष्ट
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुमारे एक लाख नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचे भाजपचे उद्दिष्ट ठेवले आहे. अलीकडेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी आणि तृणमूल काँग्रेसचे अर्जुन सिंह यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक लहान मोठ्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) ने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध रणनीती तयार केल्या आहेत. यासाठी एका प्रवेश समितीची स्थापना देखील केली आहे. (Lok Sabha Election 2024)
भाजपातील सूत्राने “हिंदुस्थान पोस्ट”ला दिलेल्या माहितीनुसार, या समितीने देशभरातील विविध पक्षांतील ८० हजार नेत्यांचा भाजपामध्ये समावेश केला आहे. या नेत्यांमध्ये केवळ राष्ट्रीय नेत्यांचाच नाही तर प्रादेशिक नेत्यांचाही समावेश आहे. एक लाख नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचे भाजपाचे उद्दिष्ट आहे. अलीकडेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, रितेश पांडे, संगीता आझाद (बहुजन समाज पार्टी), प्रनीत कौर, लालचंद कटारिया, किरणकुमार रेड्डी (आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री), सुरेश पचौरी, ज्योती मिर्धा, अर्जुन मोधवाडिया आणि रवनीत सिंग बिट्टू. (काँग्रेस), अर्जुन सिंग (टीएमसी), व्ही. वरप्रसाद राव (वायएसआरसीपी), सुशील कुमार रिंकू (आप) आणि शीतल अंगुराल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या प्रवेश समितीच्या रचनेनुसार विनोद तावडे यांच्याकडे पश्चिम भारताची जबाबदारी देण्यात आली आहे. रविशंकर प्रसाद यांच्याकडे पूर्व भारताची, राजीव चंद्रशेखर यांच्याकडे दक्षिण भारताची, अनुराग ठाकूर यांच्याकडे उत्तर भारताची आणि भूपेंद्र यादव यांच्याकडे मध्य भारताची जबाबदारी देण्यात आली आहे. १९ एप्रिलपासून देशभरात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत होणार असून, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community