Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या जनजागृतीसाठी अकोला जिल्ह्यात अनोखा उपक्रम

‘स्वीप’ अंतर्गत दोन हजार शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली

182
Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या जनजागृतीसाठी अकोला जिल्ह्यात अनोखा उपक्रम... 

जगातील सर्वात मोठी लोकशाही देश (Largest democratic country) म्हणून ओळखला जाणाऱ्या भारतात लोकसभा (Lok sabha election 2024) निवडणुकीच्या मतदानाचा पहिल्या टप्पाचे मतदान पूर्ण झाले असून. सध्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. याच संदर्भात मतदारामध्ये मतदानाबाबत जागृती (Voting Awareness) करण्यासाठी मानवी साखळीतून (Human Chain) अकोला जिल्ह्याचा नकाशा  (Akola District Map) साकारण्यात आला. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम झाला. तसेच  अकोला मतदारसंघात ७५ टक्क्यांवर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत दोन हजार शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली.  (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली!)

लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान

‘स्वीप’ (Sveep) अंतर्गत नागरी भागाबरोबरच गावपातळी पर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदान जन जागृतीचे कार्यक्रम होत आहेत. मतदानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी केले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Shridhar Patankar: उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत वाढ; चौकशी सुरू)

‘या’ गीताचे प्रसारण झाले. 

जिल्हाधिकारी अजित कुंभार (Collector Ajit Kumhar), ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच मानवी साखळीबरोबरच ‘मैं भारत हूँ’या गीताचे प्रसारणही यावेळी करण्यात आले.  (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.