Lok Sabha Election 2024 : निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिलात, तर होईल फौजदारी कारवाई

2373
Lok Sabha Election 2024: देशभरातील ८९ मतदारसंघांत अर्ज दाखल करण्याची मुदत संपली
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येत  असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी ५० हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील ५ प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत. या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पण  काही अधिकारी व कर्मचारी हे गैरहजर राहिले असून या गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत जारी करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.