लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्याचवेळी मराठी कलाविश्वातील एका ज्येष्ठ कलाकाराने निवडणूक लढवण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली आहे. त्यानंतर समाजमाध्यमावर पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामध्ये ‘नव्या स्वप्नांसाठी भ्रष्टाचारमुक्त, शरद पोक्षेंना उत्तर मुंबईत आमचे समर्थन’, असे लिहिलेल्या आणि त्याखाली ‘अबकी बार ४०० पार’, असा उल्लेख असलेल्या पोस्टचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभेच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून ज्येष्ठ अभिनेते शरद पोक्षे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. विश्वसनीय सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. (Lok Sabha Election 2024)
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, शरद पोंक्षे म्हणाले होते की, एखाद्या राजकीय पक्षाकडून विचारणा झाली, तर लोकसभा निवडणूक लढवायला मला आवडेल. मी बोरिवलीत राहतो. त्यामुळेच याच मतदारसंघातून निवडणूक लढवायची माझी इच्छा असेल. जिथे आपण राहतो तेथील परिसरातील लोक आपल्याला ओळखतात. भलत्याच ठिकाणचे लोक कसे ओळखतील? आपल्या परिसरातील लोकांसाठी लढावं. मत द्यायचं की नाही लोक ठरवतील पण आपलं काम आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटतं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आताचं राजकारण खूपच भयानक सुरू आहे. सर्व पातळ्या सोडून राजकारण सुरू आहे. सुसंस्कृतपणाचा लवलेशही नाही, म्हणूनच 2024 ची निवडणूक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक असणार आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – IPL 2024, Rohit Sharma : रोहित शर्मा खास नंबर प्लेटच्या गाडीने वानखेडे स्टेडिअमवर अवतरला तो क्षण )
आपल्या परिसरातल्या लोकांसाठी लढावं…
‘मी खासदार झालो तर’ या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ” माणसाने जिथे राहतो तिथूनच लढावं. तिथल्या परिसरातले लोक तुम्हाला वर्षानुवर्षे ओळखत असतात. कुठेतरी भलत्याच ठिकाणी उभं राहिलो, तर तिथले माणसं आपल्याला ओळखत नाहीत. आपण आपल्या परिसरातल्या लोकांसाठी लढावं. आपण जे काही केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. मग मत द्यायचं की नाही हा निर्णय लोक घेतील”.
कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची चर्चा
अभिनेते शरद पोंक्षे यांनी उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे, मात्र त्याचवेळी रविंद्र वायकर हे या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community