एका बाजूला लोकसभा (Lok Sabha Election 2024) जागावाटपाची चर्चा होत असतांना दुसऱ्या बाजूला शिंदेंना धक्क्यावर धक्के बसण्यास सुरूवात झालीय. शिरूर मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासाठी आढळराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Devendra Jhajhariya Retires : पॅरालिम्पिक खेळाडू देवेंद्र झाझरिया आंतरराष्ट्रीय खेळातूंन निवृत्त)
आढळराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढायला तयार ?
रस्सीखेच सुरु असली तरीही आढळराव पाटलांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याचा आणि जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यानंतर मध्मांशी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवायची, असा निर्णय बैठकीत घेतला होता आणि कार्यकर्त्यांची हीच इच्छा असल्याचंही ते म्हणाले होते. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीसंदर्भात त्यांनी सांगितलं होतं की अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. मात्र अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत, त्यामुळं त्यांनी या मतदारसंघावर हक्क गाजवला आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मला म्हणाले होते. त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं? अशी चर्चा बैठकीत झाली असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत सगळ्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली होती. मात्र आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आढळराव पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. त्यामुळे पुढे काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Farmer Protest : हातात तलवार घेऊन कोणी आंदोलन करत का? ही अत्यंत लाजिरवाणी बाब…उच्च न्यायालय शेतकऱ्यांवर संतापले)
मावळचे खासदार श्रीरंग बारणे कमळावर लढणार का ?
तर मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली.पिंपरीत कमळाचा उमेदवार असायला हवा, मग श्रीरंग बारणे (Shrirang Barne)असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका भाजपाने घेतली होती. त्यामुळे श्रीरंग बारणे (Shrirang Barne) भाजपाचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभा मतदार होती. याचपार्श्वभूमीवर मावळमधील महायुतीचा उमेदवार कोण असेल असं विचारल्यावर श्रीरंग बारणे ठामपणे म्हणाले की, महायुतीकडून भाजप, शिवसेनेसोबत सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे अजित पवार या महायुतीच्या घटकपक्षांचा उमेदवार काही दिवसातच स्पष्ट होईल. त्यात महायुतीचा उमेदवार मीच असेल, असे ठामपणे सांगितले आहे. याचवेळी त्यांना कमळ की धनुषबाण चिन्हावर लढवणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी महायुतीचा उमेदवार मीच असेल असे म्हणते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत संदिग्धता कायम ठेवली आहे.त्यातच ठाकरे गटाने मावळमधील उमेदवारी जाहीर करताना संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर संजोग वाघेरे यांनी माझी थेट लढत भाजपासोबत असे वक्तव्य केले आहे.यामुळेच श्रीरंग बारणे हे भाजपच्या कमळ या चिन्हावर लढणार असल्याचे लोकसभा मतदारसंघात चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)
पुण्यातल्या लोकसभेच्या तीन मतदारसंघांबाबत दोन दिवसांपुर्वी महायुतीची महत्वाची बैठक पार पडली.याच बैठकीसाठी रासप वगळता सर्व घटकपक्षांना निमंत्रण होतं. त्यामुळे मोठं नाराजीनाट्य त्या दिवशी सुरू होतं. त्यासोबत महादेव जानकर हे महायुतीला रामराम करून महाविकास आघाडीचा भाग होणार असल्याचीही चर्चाही जोर धरू लागलीय. त्यामुळे महायुतीत सध्या आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community