Lok Sabha Election 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुंबईत ५,८३६ वाहनांची झाडाझडती

प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी शहरातील हाँटेल्स, लाँज, मुसाफिरखाने अशा ७३८ अस्थापनांची झाडाझडती घेतली.

171

राज्यात लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणूकीची जय्यत तयारी चालू असून, अंतिम पाचव्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यातच लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही अपरिचित घटना किंवा समस्या निर्माण होऊ नये यासाठी मुंबईत पोलिसांनी (Mumbai Police) ‘ऑल आउट ऑपरेशन’ (operation all out) नावाचे उपक्रम राबवले होते. या उपक्रमांर्गत शहरातील विविध भागात नाकाबंदी मोहीम (Mumbai Police Nakabandi) राबवली होती. या उपक्रमांतर्गत एकूण ५ हजार ८३६ वाहनांची झाडाझडती घेतली. (Lok Sabha Election 2024)

मुंबईत पोलिसांनी ‘ऑल आउट ऑपरेशन’ नावाचे उपक्रम राबवले होते. उपक्रमांतर्गत शहरातील १६०५ ठिकाणी नाकाबंदी करत ५ हजार ८३६ वाहनांची झाडाझडती घेत दीड हजार चालकांवर कारवाई केली. तसेच २०५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवत ११२ आरोपींवर कारवाई केली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये 25 केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, नागरिकांना मतदान केंद्रांवरील गर्दी पाहता येणार)

शनिवारी रात्री १० वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या आँपरेशन आँल आऊट दरम्यान पोलिसांनी शहरातील ५३९ संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली. सोबतच पोलिसांनी २०५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवले. यात पोलीस अभिलेखावरील १०९५ गुन्हेगारांची तपासणी करुन ११२ आरोपींची धरपकड करत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच संशयितरित्या फिरणाऱ्या ८२ जणांवर कारवाई करण्यात आली. तर शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी शहरातील हाँटेल्स, लाँज, मुसाफिरखाने अशा ७३८ अस्थापनांची झाडाझडती घेतली.

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Commissioner of Police Vivek Phansalkar), विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात शहरातील पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त तसेच विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, १३ परिमंडळाचे उपायुक्त, सर्व विभागीय सहायक आयुक्त,  पोलीस ठाण्याचे व पोनि, पोलीस अधिकारी व अंमलदार या आँपरेशन आँल आऊटमध्ये सहभागी झाले होते. 

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीच खरगेंच्या फोटोला शाई फासली)

मुंबईत एकूण ०६ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासह उपनगरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकारी वर्गाच्या सुट्ट्या ही रद्द करण्यात आले आहेत. तर वैद्यकीय कारण असलेल्या पोलिसांना यातून वगळण्यात आले आहे.  (Lok Sabha Election 2024)        

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.