लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार सभांची रविवार संध्याकाळ पर्यत सांगता होईल. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारा निमित्त वेल्हे या ठिकाणी येऊन सभा घेतली. या सभेत विरोधकांचा खरपूस समाचार घेत, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात भविष्यात नव्याने केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली. तसेच वेल्हेकरांनो तुम्ही मला साथ द्या मी राजगड तालुका दत्तक घेणार असे आवाहन उपमुख्यमंत्री (DCM Ajit Pawar) अजित पवार यांनी केले. (Ajit Pawar
नणंद आणि भावजय अशी लढत लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होत असून, या एकाच कुटुंबातील निवडणुकीकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. रविवारी प्रचाराचा अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षाकडून सभांचा तडाका सुरू असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेल्हे येथील मेंगाई मंदिर मैदानात सभा घेतली. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Pakistan : पाकचे माजी मंत्री फवादकडून राहुल गांधीचे कौतुक, तर वडेट्टीवारांकडून कसाब आणि पाकिस्तानला क्लीनचीट )
या सभेत अजित पवार म्हणाले की, तालुक्यातील महत्त्वाचा मढेघाट रस्त्याबाबत बोलताना सर्वे पूर्ण झाला, असून या रस्त्याचा काही भाग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने येथे अडथळा निर्माण झालेला आहे. लवकरच हा अडथळा देखील दूर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच गुंजवणी धरणाचे (Gunjwani Dam) पाणी सर्वप्रथम विले आणि भोरकरांना मिळालेच पाहिजे ही देखील आमची आग्रही भूमिका आहे. सासवडच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः याबाबत सकारात्मक असून लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Madhya Pradesh Politics: मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार Nirmala Sapre यांचा भाजपामध्ये प्रवेश )
तसेच तालुक्यातील पर्यटनासाठी राजगड (Rajgad Fort) व तोरणा (Torna Fort) या किल्ल्याच्या विकासासाठी सर्व्हे करणार असून भरघोस असा निधी देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. वेल्हे तालुक्यातील नागरिकांना साध्या मूलभूत गरजा पूर्ण करता आल्या नाहीत. तर त्यांना झोप तरी कशी काय लागते खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) व विद्यमान आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thope) यांचे नाव न घेता अजित पवार यांनी टीका केली. लोकसभेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुमित्रा पवार यांना साथ द्या म्हणजेच मला साथ द्या मी राजगड तालुका दत्तक (Rajgad taluka adopted) घेणार असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले. (Ajit Pawar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community