Ajit Pawar यांनी काका आणि बहिणीला बारामतीतच का गुंतवले?

288
Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर अजित पवार नाराज ?; एनडीएच्या बैठकीपूर्वी उचलण्यात आले 'हे' पाऊल

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची खेळी करून काका  शरद पवार (Sharad Pawar) आणि  बहिण सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीच्या बाहेर प्रचारासाठी  फिरता येणार नाही, याचा चोख बंदोबस्त केला आहे.

सुनेत्रा यांचे नाव जवळपास निश्चित

अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress) सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar)  यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास निश्चित झाले आहे. सुनेत्रा (Supriya Sule) यांनी प्रचाराला सुरुवातही केल्याचे समजते. मागील सलग  दोन निवडणुकीत विजय मिळवल्याने सुप्रिया यांचे मनोधैर्य उंचावले होते आणि आपण येणारी लोकसभा निवडणुकाही बारामतीतून सहज जिंकू, अशा अविर्भावात सुप्रिया होत्या. एकूणच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षाला (Nationalist Congress) त्यांनी गृहीत धरले होते.

(हेही वाचा- Sharad Pawar : योगेश सावंत ते शरद पवार; काय आहे ब्राह्मण विरोधी कनेक्शन?)

गावात चर्चा, नणंद-भावजयची

मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा यांच्या उमेदवारीचे सूतोवाच केले तसे बारामतीतील वातावरण ढवळून निघाले. नणंद-भावजय या चर्चांना गावात उधाण आले. कोण बाजी मारणार आणि कोण चितपट होणार, यावर गावातील पारावर चर्चा झडू लागली. सुनेत्रा यांनी प्रचाराला सुरुवातही केली. आता नणंद-भावजय अशा थेट लढतीमुळे या प्रतिष्ठेच्या लढतीत शरद पवार (Sharad Pawar) आणि खुद्द उमेदवार सुप्रिया सुळे यांना याच मतदार संघात ठाण मांडून बसण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे अन्य मतदार संघाकडे दुर्लक्ष होऊन त्याचा राजकीय फायदा सत्ताधारी महायुतीला (Mahayuti) होईल, अशी सोय अजित पवार(Ajit Pawar)  यांनी केली.

सुप्रिया बारामतीत तळ ठोकून

ज्या दिवसापासून सुनेत्रा यांनी प्रचाराला सुरुवात केली तेव्हापासून सुप्रिया या बारामतीत तळ ठोकून आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar), काका आणि बहिणीला बारामतीत अडकवून राज्यभर पक्षकार्यात व्यस्त आहेत. येत्या शनिवारी २ फेब्रुवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरीच्या मैदानात नमो महारोजगार मेळावा हा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.