Lok Sabha Election 2024 : अमोल कीर्तीकरांना उमेदवारी; उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून घरचा अहेर

Lok Sabha Election 2024 : गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांच्या मुलालाच उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव आहे. या खेळीमुळे काँग्रेसचे संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली आहे.

344
Lok Sabha Election 2024 : अमोल कीर्तीकरांना उमेदवारी; उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून घरचा अहेर
Lok Sabha Election 2024 : अमोल कीर्तीकरांना उमेदवारी; उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून घरचा अहेर

शिवसेनेला शह देण्यासाठी उबाठा गटाने उत्तर पश्चिम मुंबई (North West Mumbai) लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांच्या मुलालाच उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव आहे. या खेळीमुळे काँग्रेसचे संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली आहे. ‘शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष’ असे म्हणून निरूपम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खिल्ली उडवली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Udhayanidhi Stalin : ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे उदयनिधी स्टॅलिनपर्यंत)

यामुळेच महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्षही चव्हाट्यावर आला आहे. महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 8 जागांचा अजूनही वाटाघाटी चालू आहेत. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना त्यांचे वडील गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच या जागेवरून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत असलेले काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

घोटाळेबाज, कमिशनबाज आणि बरेच काही

संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांची शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष असे म्हणत खिल्ली उडवली आहे. “काल सायंकाळी शिल्लक शिवसेनेच्या प्रमुखांनी अंधेरीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली. शिवसेनेच्या वतीने ज्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तो कोण आहे? तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज आहे. त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकद्वारे लाच घेतली आहे. गरिबांना जेवण देण्याच्या योजनेत शिवसेनेच्या घोषित झालेल्या उमेदवाराने कमिशन घेतलं आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे”, असे गंभीर आरोप संजय निरूपम यांनी अमोल कीर्तिकर यांच्यावरही केले आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची जागा आमची – उबाठा गटाचा दावा

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची जागा आमची आहे. आम्ही आज उमेदवार जाहीर करू अथवा उद्या… हा आमचा अधिकार आहे. सोशल मीडियावर बोलण्याऐवजी संजय निरुपम यांनी काँग्रेससोबत बोलायला हवे. हा भाग वेगळा की, त्यांना काँग्रेस किती गांभीर्याने घेते. पण, तो त्यांच्या पक्षातंर्गत मुद्दा आहे”, असे उबाठा गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.