Lok Sabha Election 2024 : मुंबईसह १३ मतदार संघांत पाच वाजेपर्यंत अंदाजे ४८.६६ टक्के मतदान

171
Minority Votes : अल्पसंख्यांक मतांसाठी महायुती सरकारकडून ‘मार्टी’ ची स्थापना

लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदानाच्या दिवशी पाच वाजेपर्यंत अंदाजित ४८.६६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सर्वांधिक सरासरी मतदान हे दिंडोरी मतदार संघात असून सरासरी सर्वांत कमी मतदान हे कल्याण मध्ये ४१ टक्के एवढे झाले होते. मात्र, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असली तरी काही मतदार संघांमध्ये सहा वाजेपर्यंत मतदार केंद्रांमध्ये उपस्थित राहिलेल्या शेवटच्या मतदाला मतदान करता येईल याप्रमाणे मतदानाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांमध्ये संध्याकाळी सात ते आठ वाजे पर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे अंतिम आकडेवारी ही उशिरापर्यंत जाहीर केली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ४८.६६टक्के मतदान झाले आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही केंद्रांमध्ये धिम्या गतीने मतदानाची प्रक्रिया राबवली जात होती, परिणामी अनेकांना तासनतांस केंद्राबाहेर रांगेमध्ये उभे राहावे लागले होते. (Lok Sabha Election 2024)

विलंबामागील कारणे काय?

काही ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांमध्ये मतदान मशिन चालू व्हायला उशिरा झाला त्यामुळे सुरुवातील मतदानाची प्रक्रिया सुरु व्हायला वेळ लागला. या मध्ये पश्चिम येथील कस्तुरबा महिला मंडळ येथील मतदान केंद्रा ७ वाजून २८ मिनिटांनी मतदानाला सुरुवात झाली असल्याचा आरोप आशिष जानी यांनी केला आहे. त्यामुळे ही २८ मिनिटे वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली होती. तर शीव प्रतीक्षा नगर येथेही मतदान प्रक्रिया विलंबाने सुरु असल्याने मतदारांना तासनतांस रांगेत उभे राहावे लागले होते. (Lok Sabha Election 2024)

मात्र, या विलंबामागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अशी माहिती समोर आली की सकाळी पहिल्या टप्प्यात मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. सरकारी कार्यालयांची सुट्टी वगळता खासगी कार्यालयांना सुट्टी नव्हती. त्यातुलनेत त्यांना एक ते दोन तासांची तथा अर्ध्या दिवसाची सवलत दिली होती. त्यामुळ कामावर जायचे असल्याने खासगी कार्यालयांमधील कर्मचारी हे सकाळीच मतदान केंद्रावर आल्याने एकच गर्दी झाली. त्यामुळे मतदान केंद्रांमध्ये रांगा वाढल्याने त्यांना किमान अर्धा तास ते दोन तास या या रांगांमध्ये उभे व्हावे लागले. यामध्ये विलंब करण्याचा कोणताही हेतू असण्याचे कारण नव्हते, परंतु जिथे सकाळी रांगा लागल्या होत्या, तिथे दुपारी ही केंद्र ओसाड पडली होती, तिथे केवळ दोन ते चार मतदारच रांगेत उभे असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे एकाच वेळी मतदारांनी गर्दी केल्यामुळे रांगा अधिक वाढल्याचे दिसून येत होत्या असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदानाचा टक्का घसरला; Aditya Thackeray यांचा आरोप)

मतदान केंद्रांमध्ये असुविधा

राज्य निवडणूक आयोगाने मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघांसाठी मतदानासाठी तयार केलेल्या केंद्रांमध्ये मोठ्याप्रमाणात सुविधांचा बोजवारा उडाल्याचे पहायला मिळाले. मतदान केंद्र निश्चित करताना मैदानांचा वापर टाळला आणि त्याऐवजी बंदिस्त मतदान केंद्र म्हणून शाळांचा वापर केला. धारावी कोळीवाडा येथील रॉयल सिटी इंग्लिश हायस्कूल व कंबन हायस्कूलच्या मतदान केंद्रात कोणत्याही प्रकारची पंख्यांची तसेच कुलरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांसह पोलिसांना आतील वातावरणाचा चांगला फटका बसत होता. आतमध्ये हवेशीर वातावरण नसल्याने घामाने ते डबडबून गेले होते. त्यांच्यासोबत पोलिसही घामाने भिजून गेले होते. त्यामुळे कोंदट वातावरण येथील कर्मचाऱ्यांसह पोलिसांना काम करावे लागत होते. (Lok Sabha Election 2024)

यांनी बजावला मतदानाचा अधिकार

चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन परेश रावल यांनी सपत्निक, धर्मेद्र, हेमा मालिनी, सुनील शेट्टी, गुलजार, अक्षय कुमार , गोविंदा, अनिता राज, माधुरी दिक्षित, अशोक सराफ, प्रशांत दामले, शिल्पा शेट्टी, शमिका शेट्टी, क्रिकेट पटू सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर, उद्योगपती रतन टाटा, अनिल अंबानी आदींनी मतदानाचा अधिकार बजावला. (Lok Sabha Election 2024)

पाचव्या टप्प्यातील सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजित टक्केवारी पुढीलप्रमाणे :

भिवंडी – ४८. ८९ टक्के

धुळे – ४८. ८१ टक्के

दिंडोरी – ५७. ०६ टक्के

कल्याण – ४१. ७० टक्के

मुंबई उत्तर – ४६. ९१ टक्के

मुंबई उत्तर मध्य – ४७. ३२ टक्के

मुंबई उत्तर पूर्व – ४८. ६७ टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – ४९. ७९ टक्के

मुंबई दक्षिण – ४४. २२ टक्के

मुंबई दक्षिण मध्य – ४८.२६ टक्के

नाशिक – ५१.१६ टक्के

पालघर – ५४. ३२ टक्के

ठाणे – ४५.३८ टक्के

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.