दुसऱ्या टप्प्यातील मतदान (Lok Sabha Election 2024) सुरू असताना गोंदिया आणि नागपूरमध्ये काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मतदान (Lok Sabha Election 2024) सुरू होण्यास उशीर झाला. तर हिंगोलीत ३९ मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा आला आहे. हिंगोलीत ३९ बॅलेट मशीन आणि १६ कंट्रोल युनिट बदलले. २५ ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा –Lok Sabha Election Phase 2: आठ मतदारसंघात आतापर्यंत किती टक्के मतदान? वाचा सविस्तर)
एकूण ३९ हून अधिक मतदान केंद्रावर (Lok Sabha Election 2024) पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाला अडथळा मतदानाला आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या मतदान सुरळीत सुरू आहे. सकाळच्या टप्प्यात (Lok Sabha Election 2024) तापमानाचा पारा कमी असल्याने मतदारांनी सकाळी गर्दी केली होती. मात्र मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे मतदानाचा टक्का थोडा घसरला आहे. हिंगोली ७.२३ टक्के मतदान झाले. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community