लोकसभा निवडणूक २०२४ च्या ५व्या टप्प्यातलं मतदान सोमवार, (२० मे) रोजी होणार आहे. यामुळे देशातील ८ राज्यांतील ४९ शहरांमध्ये मतदानामुळे बँका बंद राहणार आहेत. नागरिकांनी सोमवारी अर्थात मतदानाच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी याची नोंद घेणे आवश्यक आहे. (Lok Sabha Election 2024)
मतदानामुळे शहरांमध्ये सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका बंद राहणार आहेत. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, येथे मतदान होणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका, बंद राहणार आहेत. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, लखनऊ, मुंबईमध्ये मतदानाच्या दिवशी सर्वांना मतदान करता यावे यासाठी बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बँका आणि सरकारी कार्यालयांना भरपगारी रजा देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – River Rafting Places : भारतातील प्रसिद्ध रिव्हर राफ्टिंग ठिकाणे)
उत्तर प्रदेशच्या १४ मतदारसंघ, महाराष्ट्राच्या १३ मतदारसंघ, पश्चिम बंगालच्या ७ मतदारसंघ, बिहारच्या ५ मतदारसंघ, ओडिशाच्या ५ मतदारसंघ, झारखंडच्या ३ मतदारसंघ, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या प्रत्येकी १ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
बँका कोणत्या शहरांत बंद राहणार ?
– महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण येथे मतदान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
– उत्तर प्रदेशमध्ये मोहनलाल गंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा येथे मतदान होणार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.
– ओडिशातील बारगढ, सुंदरगढ, बोलंगीर, कंधमाल आणि आस्कामध्ये मतदानामुळे बँका बंद राहणार आहेत.
– झारखंडमधील चतरा, कोडरमा आणि हजारीबागमध्ये मतदानामुळे बँका बंद राहतील.
हेही पहा –