Lok Sabha Election 2024: बारामतीत पोस्टर वॉर! सुप्रिया सुळेंनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स

158
Lok Sabha Election 2024: बारामतीत पोस्टर वॉर! सुप्रिया सुळेंनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स
Lok Sabha Election 2024: बारामतीत पोस्टर वॉर! सुप्रिया सुळेंनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सातव्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. आता देशभरात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. येत्या 4 जून रोज या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. त्यापूर्वी कार्यकर्ते ठिकठिकाणी आपल्या नेत्याच्या विजयाचे बॅनर्स लावत आहेत. (Lok Sabha Election 2024)

बॅनर्सची चर्चा

दरम्यान, बारामती (Baramati) मतदारसंघातही हेच चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या विजयाचे बॅनर लावले असून सध्या त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. इंदापूरात शरदचंद्र पवार गटाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विजयाचे बॅनर लावल्याचे पहायला मिळाले. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष वसिम बागवान यांनी आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच लावलेल्या या बॅनर्सची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. (Lok Sabha Election 2024)

एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

दरम्यान, एक जूनचे मतदान संपल्यानंतर संध्याकाळी वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले. या आकड्यांच्या मदतीने देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीए सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणुकीत एनडीएला (NDA) 353-383 तर इंडिया आघाडीला (INDIA Alliance) 152-182 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.