Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगांवर भाजपाही नाराज; मतदारांचे हाल दुर्दैवी, Pravin Darekar काय म्हणाले? वाचा सविस्तर…

भविष्यात निवडणूक आयोगाने काय काय काळजी घ्यावी याचा बोध घेऊन दुरुस्ती केली पाहिजे अशी मागणी दरेकरांनी केली. 

180
Pravin Darekar यांनी संजय राऊतांना दिला 'हा' इशारा; म्हणाले...

देशभरात १८ व्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून,  राज्यात अंतिम  पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पाचव्या टप्प्यात एकूण १३ लोकसभा मतदारसंघात  मतदान होत असून, त्यापैकी मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ०६ लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात मुंबईकर मोठ्या संख्येने सामील झाला आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रावर (Mumbai Polling Station) लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. तिथे अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्यावरून भाजपा नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदारांचे हाल हे दुर्दैवी आहे असं म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – IPL 2024 RCB in Playoff : तळातून थेट बाद फेरीत पोहोचलेल्या बंगळुरू संघाविषयी खुद्द विराट कोहली काय म्हणतो?)

प्रविण दरेकर म्हणाले की, निवडणूक आयोगाने पूर्णपणे लोकांचा, मतदारांचा, तेथे असणारे रूम्स, तेथील व्यवस्था, व्हेन्टीलेशन याचा कसलाही विचार केलेला दिसत नाही. ही बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने जो मतदार आलाय तो तीन ते चार तास रांगेत उभा आहे. आम्हालाही मदतीच्या मर्यादा येतात. आचारसंहिता, पोलीस, निवडणूक आयोग या कचाट्यातून एका लिमिटच्या बाहेर काही करता येत नाही असे प्रविण दरेकर यांनी सांगितले. तसेच भविष्यात निवडणूक आयोगाने काय काय काळजी घ्यावी. याचा बोध घेऊन दुरुस्ती केली पाहिजे अशी मागणी दरेकरांनी केली.   (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Manchester City Wins EPL : मॅन्चेस्टर सिटीने सलग चौथ्यांदा जिंकली प्रिमिअर लीग)

दरम्यान, प्रत्येक बूथवर, पोलिंग सेंटरवर प्रचंड मतदारांची गर्दी होताना दिसतेय. मतदारांचा जबरदस्त अंडरकरंट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) बाजूने असल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आम्ही खरोखर त्यासमोर नतमस्तक होतो. असे विधान दरेकर यांनी केले. आम्ही त्यांना धन्यवाद देतो. लोकशाहीचा उत्सव समजून आज त्रास होत असतानाही तीन-तीन तास मतदानाचा हक्क बजावताहेत हे खरोखर अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. आम्ही त्यांच्या सहनशक्तीला निश्चितच सॅल्यूट करतो असे विधान भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी केले.  (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.