Lok Sabha Election 2024 : हरियाणातील १० जागा जिंकण्यासाठी भाजपा मैदानात

106
NDA ला एकत्र ठेवणे भाजपासाठी तारेवरची कसरत
  • वंदना बर्वे

भारतीय जनता पक्ष हरयाणातील सर्व १० जागांवर विजय मिळविण्याचा विडा उचलून कुरूक्षेत्राच्या मैदानात उतरला आहे. २०१९ मध्ये भाजपाचे सर्व १० उमेदवार निवडून आले होते. आता या निकालाची पुनरावृत्ती करण्याची योजना भाजपाने आखली आहे. हरियाणातील सर्व १० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणे आहे. येथे सहाव्या टप्प्यात अर्थात २५ मे रोजी राज्यातील दोन कोटी मतदार २२३ उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला करणार आहेत. यात २०७ पुरूष आणि १६ महिलांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपाने हरयाणातील मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला. मनोहरलाल खट्टर यांच्या जागी नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री बनविले. हा निर्णय घेऊन भाजपाने राज्यातील गैर जाट मतदारांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. महत्वाचे सांगायचे म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय नेहमीच भाजपाच्या पथ्यावर पडला आहे. उत्तराखंड आणि गुजरात याचे जीवंत उदाहरण आहे. हाच डाव लोकसभेच्या निवडणुकीतही यशस्वी होण्याची आशा आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – विधानसभेतही Baramati मध्ये पवार विरुद्ध पवार; अजित पवारांच्या विरोधात कोण?)

हरियाणातील १० जागांच्या या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला अग्निपरिक्षा द्यायची असेल तर ती भाजपाला द्यावी लागणार आहे. कारण, विद्यमान सर्व १० खासदार हे भाजपाचेच आहेत. यामुळे या सर्व जागा आपल्याकडे कायम ठेवण्याचे आव्हान भाजपापुढे आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाचा हरियाणामध्ये खरा ग्राफ वाढला तो २०१४ मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लाटेत भाजपाने हरियाणातील ७ जागा जिंकल्या होत्या आणि २०१९ मध्ये सर्व १० जागांवर आपला झेंडा फडकविला. मतांची टक्केवारी सुध्दा ४१ हून ५८ टक्क्यांवर पोहचली. आता भाजपाला १० जागा आपल्याकडे कायम ठेवायच्या आहेत आणि कॉंग्रेस त्या हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. दोन्ही पक्षांच्या डावपेचामुळे हरियाणातील वातावरण आता रोमांचक वळणावर आले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – शरद पवार सेक्युलर नाहीत, ते संधीसाधू आहेत; Prakash Ambedkar यांची टीका)

भाजपाचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्याच्या काळात झालेल्या विकासकामांच्या अवतीभोवती केंद्रीत आहे. रणनितीकार यासाठी खास मुद्यांची माहिती नेत्यांना भाषणासाठी देत आहेत. दुसरीकडे, कॉंग्रेस पक्ष स्थानिक समस्यांवर सर्वाधिक भर देण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे सत्ताविरोधी लाटेचा फायदा मिळण्याची आशा कॉंग्रेसला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी तर लोकसभेच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीशी जोडले आहे. जनता जननायक पार्टीने भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचा विजय अधिक आशादायी झाला आहे. (Lok Sabha Election 2024)

महत्वाचे म्हणजे, राज्यात एकही जागा नसलेल्या कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. कॉंग्रेस नऊ जागा लढत आहे. यातील आठ उमेदवार हे भूपेंद्रसिंग हुड्डा यांचे समर्थक आहेत. तर, कुमारी शैलजा या सिरसामधून स्वबळावर फाईट देत आहेत. मात्र, त्यांच्या मदतीला चौधरी विरेंद्र सिंग, रणजीत सुरजेवाला आणि किरण चौधरी आहेत. हुड्डा सिरसाला एकदाही प्रचाराला गेले नाहीत. तर शैलजा यांनी सुध्दा त्यांना बोलाविण्याची तसदी घेतली नाही. कुरूक्षेत्राची जागा आपला गेली असून सुशील गुप्ता इंडी आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. हुड्डा दिवसभर सर्व मतदारसंघात फिरतात. परंतु, रात्री रोहतकमध्ये येतात. कारण मुलगा दीपेंदर हुड्डा येथून मैदानात आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election : दक्षिण मध्य मुंबईत जो लावेल जास्त जोर, त्याचाच होईल शोर)

कोण आहे कोणत्या मैदानात

कुरूक्षेत्र— नवीन जिंदाल (भाजपा), अभय चौटाला (इंडियन नॅशनल लोकदल) आणि सुशील गुप्ता (आप).
अंबाला— बंतो कटारिया (भाजपा), वरूण चौधरी (कॉंग्रेस)
सिरसा— अशोक तंवर (भाजपा), आणि कुमारी शैलजा (कॉंग्रेस)

हिसार— रणजित सिंह चौटाला (भाजपा), जय प्रकाश (काँग्रेस) आणि नयना चौटाला (जेजेपी).

करनाल— माजी मुख्यमंत्री मनोहर लाल (भाजपा), दिव्यांशु बुध्दीराज (कॉंग्रेस)

सोनीपत— मोहनलाल बडोली (भाजपा), सतपाल ब्रम्हचारी (कॉंग्रेस)

रोहतक— अरविंद कुमार शर्मा (भाजपा), दीपेंदरसिंग हुडा (कॉंग्रेस)

भिवानी—महेंद्रगड— चौधरी धर्मवीर सिंग (भाजपा), रावदान सिंग (कॉंग्रेस), राव बहादुर सिंग (जजपा)

गुडगाव— माजी केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंग (भाजपा), राजबब्बर (कॉंग्रेस) राहुल यादव फाजिलपुरिया (जजपा)

फरिदाबाद — कृष्णपाल गुर्जर (भाजपा), महेंद्र प्रताप (कॉंग्रेस), नलिन हुडा (जजपा) (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.