Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून भाजपा, शिंदे गटाचे नेते दूर

193

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या यादीत महायुतीच्या नेत्यांचा समावेश असताना अजित पवार गटाच्या यादीत फक्त त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचा समावेश असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बुधवार, २७ मार्च रोजी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. या दोन्ही यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्यासह भाजपचे केंद्रिय आणि राज्यातील नेत्यांचा समावेश होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला (Lok Sabha Election 2024) दिलेल्या यादीत फक्त त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी ३७ नेत्यांचा समावेश आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : राजू पारवेंनी आधी भरला उमेदवारी अर्ज, नंतर शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारी)

भाजपच्या दहशतीने नवाब मलिक यांचे नाव वगळले…

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जात असलेले नवाब मलिक आता मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत दिसून येत नाहीत. हिवाळी अधिवेशनादरम्यान जामिनावर बाहेर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यामुळे सावध भूमिका घेत स्टार प्रचारकांच्या यादीतून आधीच त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.