पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाने यावेळी ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. मात्र, चारशेचा आकडा कसा गाठता येईल? याकडे भाजपाच्या रणनितीकारांचे लक्ष लागून आहे. चारशे पारची संख्या गाठण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दक्षिणात्य राज्यावर बरेच फोकस केले आहे. दुसऱ्या टप्प्यात दक्षिनेतील ३४ जागावर मतदान होणे आहे. यात कर्नाटकमधील १४ आणि केरळमधील २० जगाचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)
पहिल्या टप्प्यात दक्षिनेतील तामिळनाडू आणि पुडूचेरी या दोन्ही राज्यातील संपूर्ण जागेवर मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नशिबाचा फैसलासुद्धा याच दुसऱ्या टप्प्यात होणे आहे. ते वायनाडमधून निवडणूक लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हा आकडा गाठण्यासाठी दक्षिण भारतावर फोकस केला आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी आणि तामिळनाडू या पाचही राज्यांत योजनाबध्द पध्दतीने निवडणूक लढण्याची योजना भाजपाने आखली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या राज्यात यापूर्वी यश मिळाले नाही तेथे भाजपकडून खास लक्ष दिले जात आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्का; मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव Sunil Chavan भाजपामध्ये)
या ५ राज्यांचा समावेश
भारतातील दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण १२९ जागा आहेत. यात तामिळनाडू (३९), कर्नाटक (२८), केरळ (२०), तेलंगणा (१७) आणि पुडुचेरी (१) जागांचा समोवश आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला (BJP) यातील २९ जागा मिळाल्या होत्या. यात कर्नाटकात २५ आणि तेलंगणातील चार जागांचा समावेश आहे. उर्वरित केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यांत भाजपाचे खाते सुध्दा उघडले नव्हते. (Lok Sabha Election 2024)
आता भाजपाने (BJP) लोकसभेच्या या निवडणुकीत दक्षिणेच्या पाच राज्यांत दुप्पट जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. अर्थात २०२९ मध्ये मिळालेल्या २९ जागांच्या दुप्पट जागा म्हणजे ५८ जागा. आतापर्यंतच्या निवडणूक इतिहासात केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपाची शक्ती दुप्पट करण्याचा विडा उचलला आहे. अलीकडेच त्यांनी त्रिशूरमध्ये रोड शो आणि रॅली काढली होती. आता भाजपा नेते तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रचाराला सुरुवात करणार आहेत. कर्नाटकात भाजपाचे कॅडर आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना २५ जागा मिळाल्या होत्या. जेडीएससोबत झालेल्या करारानंतर यावेळीही पीएम मोदींना कर्नाटकमध्ये मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community