पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२४ मध्ये २०१९ पेक्षा मोठा विजय मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यात ही तीन राज्ये सिंहाचा वाटा उचलू शकतात. याची जाणीव झाल्यामुळे या राज्यांची कमांड गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी आपल्या हाती घेतली आहे. (Lok Sabha Election 2024)
भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागला आहे. पंतप्रधानांनी २०१९ मध्ये मिळाला होता त्यापेक्षा मोठा विजय २०२४ मध्ये मिळवायचा असल्याचे आवाहन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना केला आहे. पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्यासह तमाम नेते कामाला लागले आहेत. कोणत्या राज्यांतून किती जागा मिळू शकतात आणि २०१९ पेक्षा मोठा विजय मिळविण्यासाठी कोणत्या राज्यांवर फोकस करायचा याची योजना आखायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपच्या मिशन २०२४ मध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. (Lok Sabha Election 2024)
५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य
या तीन राज्यांमध्ये ५० हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहे. महत्वाचे म्हणजे, अमित शहा (Amit Shah) यांनी या तिन्ही राज्यांची कमान आपल्या हातात घेतली आहे. यापूर्वी, शहा यांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही राज्यांची कमान हाती घेतली होती आणि घवघवीत यश मिळविले होते. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपला या तीन राज्यांत फक्त ३० जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने येथे ५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशावरही भाजपने खास फोकस केला आहे. २०१९ मध्ये भाजपच्या विजयाचा आकडा ३०३ पर्यंत नेण्यात या तीन राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Nanded: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर गाडीला भीषण आग)
भाजपने बंगालमध्ये ३३ जागांवर विजयाची आखली रणनीती
२०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला या तीन राज्यांमध्ये केवळ चार जागा जिंकता आल्या होत्या. यात पश्चिम बंगालमधील दोन आणि ओडिशा आणि तेलंगणामधील प्रत्येकी एक जागा होती. २०१९ मध्ये, या तीन राज्यांमध्ये २६ जागा वाढवण्यात भाजपला यश आले होते. यातील १६ पश्चिम बंगालमध्ये, ओडिशात ७ आणि तेलंगणात चार जागा होत्या. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. २०१९ मध्ये १८ जागा जिंकल्या होत्या. परंतु, बंगालमध्ये प्रयत्न केले तर याहीपेक्षा जास्त जागा जिंकता येऊ शकतात असे भाजपला वाटू लागले आहे. आता भाजपने बंगालमध्ये ३३ जागांवर विजयाची रणनीती आखली आहे. (Lok Sabha Election 2024)
लोकसभेत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता
ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ जागा असून २०१९ मध्ये भाजपला सात जागा जिंकण्यात यश आले होते. यावेळी भाजपने किमान १५ जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे. तसेच तेलंगणा विधानसभेत बीआरएसचा (BRS) पराभव झाल्यानंतर लोकसभेत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) थेट लढत होण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये लोकसभेच्या एकूण १७ जागा असून यावेळी जिंकलेल्या जागांची संख्या दुप्पट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तेलंगणाच्या रणनीतीशी संबंधित भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, २०१९ मध्ये पक्ष दोन जागांवर अतिशय कमी फरकाने पराभूत झाला होता आणि इतर दोन जागांवर कामगिरी चांगली होती. अशात भाजपने (BJP) प्रयत्न केले तर किमान १० जागा सहज जिंकता येतील, असा भाजपला विश्वास आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील २०१९ चे नुकसान भरून काढण्याची भाजपला आशा आहे. २०१४ मध्ये ७२ जागा जिंकल्यानंतर २०१९ मध्ये १० जागा कमी झाल्या होत्या. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community