-
वंदना बर्वे
दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी भाजपा आणि काँग्रेस-आप आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे. भाजपा सर्व जागा जिंकून हॅटट्रीक मारण्याच्या मूडमध्ये आहे तर काँग्रेस-आप आघाडीसुध्दा सत्ताधारी पक्षाचा धुव्वा उडविण्यासाठी कंबर कसून आहे.
18 व्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) पाच टप्पे पूर्ण झाले आहेत आणि दोन टप्पे उरले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत आणि सध्या या सर्व जागांवर भाजपाचा ताबा आहे.
मागच्या दोन निवडणुकांपासून भाजपा दिल्लीतील सर्व जागांवर विजय मिळवित आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपाचे सर्व सातही उमेदवार विजयी झाले होते. मात्र, काँग्रेसला एकही जागा मिळाली नसली तरी 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये मतांची टक्केवारी बऱ्यापैकी वाढली होती, हे विसरून चालणार नाही. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – IPC 406 In Marathi : काय आहे IPC चा कलम ४०६? आणि याअंतर्गत कशी होते शिक्षा?)
सर्वात महत्वाचा मुद्या असा की, भाजपाने दिल्लीतील सातपैकी सहा खासदारांचे तिकीट कापले आहे. ईशान्य दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांना पुन्हा तिकीट दिले आहे. अशात, सहा नवीन उमेदवारांना सोबत घेवून भाजपा हॅटट्रीक साधू शकणार काय? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या एकेकाळच्या कट्टर प्रतिस्पर्धी पक्षांनी यावेळी आघाडी केली आहे. यामुळे भाजपाला यावेळेस तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आम आदमी पक्ष चार जागा तर काँग्रेस 3 जागा लढवित आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीत लोकसभेच्या सात जागांसाठी सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. आप- पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि नवी दिल्ली लोकसभा जागा लढवत आहे, तर काँग्रेस- ईशान्य दिल्ली उत्तर पश्चिम दिल्ली आणि चांदनी चौक लोकसभा जागांवर लढत आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : सूर्यकुमार यादव, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी केलं लोकसभेसाठी मतदान)
दिल्लीतील कोणत्या जागेवरून कोणत्या पक्षाचा उमेदवार?
नवी दिल्ली – भाजपाने दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना संधी उमेदवारी दिली आहे. तर ‘आप’ने सोमनाथ भारती यांना मैदानात उतरविले आहे.
चांदणी चौक – प्रवीण खंडेलवाल हे येथून भाजपाचे उमेदवार आहेत. काँग्रेसने जेपी अग्रवाल यांच्यावर बाजी मारली आहे.
पूर्व दिल्ली – भाजपाने येथून हर्ष मल्होत्रा यांना तिकीट दिले आहे, तर कुलदीप कुमार आपकडून रिंगणात आहेत.
ईशान्य दिल्ली – भाजपाने पुन्हा एकदा मनोज तिवारी यांना येथून तिकीट दिले आहे तर कॉंग्रेसने कन्हैया कुमार यांना त्यांच्या विरोधात उतरविले आहे.
उत्तर-पश्चिम दिल्ली – भाजपाच्या तिकिटावर योगेंद्र चंदौलिया निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने येथून उदित राज यांना उमेदवारी दिली आहे.
पश्चिम दिल्ली – भाजपाने कमलजीत शेहरावत यांना संधी दिली आहे. ‘आप’ने महाबळ मिश्रा यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
दक्षिण दिल्लीतून – रामवीर सिंग बिधुरी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत, तर आपने सहिराम पहेलवान यांना संधी दिली आहे.
(हेही वाचा – Fire System : अग्निरोधक प्रणाली नाही, मग बिनधास्त करा कारवाई ‘त्या’ इमारतींवर ! आयुक्तांचे निर्देश)
नवी दिल्ली आणि ईशान्य दिल्ली या दोन मतदारसंघात जबरदस्त लढाई बघायला मिळत आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून बांसुरी स्वराज विरूध्द सोमनाथ भारती अशी लढाई आहे. तर, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी विरुद्ध फायरब्रॅंड नेते कन्हैय्या कुमार यांच्यात चुरस आहे. या दोन जागांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वोच्च कामगिरी केली होती. 2004 मध्ये दिल्लीत 7 पैकी 6 जागा पक्षाने जिंकल्या होत्या. यावेळी 55% मते मिळाली. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसने 7 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. तर मतांची टक्केवारी 57% वर पोहचली होती. मात्र, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नावाच्या लाटेत 2014 मध्ये काँग्रेस भुईसपाट झाली. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 15 टक्क्यांपर्यंत घसरली. एकही जागा मिळाली नाही. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 23% पर्यंत वाढली असली तरी यावेळी त्यांना एकही जागा मिळाली नाही. दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने सर्व जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये भाजपाला 46% आणि 2019 मध्ये 57% मते मिळाली. (Lok Sabha Election 2024)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर आल्यामुळे दिल्लीचे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. सध्या केजरीवाल आणि खासदार संजय सिंग दोन्ही नेते धुंवाधार प्रचार करीत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाने सातही जागा जिंकल्या तर ती भाजपाची हॅटट्रीक असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community