Lok Sabha Election 2024 : कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या निवडणूक प्रचारातून गायब

194
Lok Sabha Election 2024 : कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या निवडणूक प्रचारातून गायब

तब्बल चार दशकांपासून पंजाबचं राजकारण ज्यांच्या अवतीभोवती फिरत होतं ते कॅप्टन अमरिंदर सिंग लोकसभेच्या या निवडणुक प्रचारातून गायब झाले आहेत. प्रकृतीच्या कारणांमुळे ते पत्नी परनीत कौर यांच्या प्रचारासाठीसुध्दा बाहेर पडू शकलेले नाहीत. असं असलं तरी, आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

पंजाबच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग. मागील चार दशकांपासून राज्याचं राजकारण त्यांच्या अवतीभोवती फिरत राहिलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते कॅप्टन अमरिंदर सिंग हे आता मात्र गायब आहेत. सध्या ते सक्रीय दिसत नाहीत. (Lok Sabha Election 2024)

कॅप्टन यांनी पत्नी आणि पटियालाहून भाजपाच्या उमेदवार परनीत कौर यांच्या निवडणूक प्रचारात भाग घेतलेला नाही. यामागे त्यांच्या प्रकृतीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. कॅप्टनचे २०२२ मध्ये इंग्लंडमध्ये मणक्याचे ऑपरेशन झाले होते. यामुळे त्यांना चालताना त्रास होतो. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या सैनिकीकरणामुळे आपल्या देशाचं अस्तित्व टिकून आहे; मंजिरी मराठे यांचे प्रतिपादन)

तब्येत बिघडण्याचे कारण…

कॅप्टन यांना आजारी असल्याचे बघून विरोधकांनी परनीत कौर यांना एकट्या बघून घेरायला सुरवात केली आहे. शंभू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी परनीत कौर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. जेव्हा की, २०२० मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री असताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकरी संघटनांना सर्वाधिक मदत केली होती. (Lok Sabha Election 2024)

पंजाबच्या राजकीय वातावरणावर कॅप्टनची नजर

कॅप्टन सध्या सक्रीय नसले तरी पंजाबच्या राजकीय वातावरणावर ते लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांकडून समजते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची त्यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेते रामिंदर आवला यांना उमेदवारी मिळवून द्यायची होती. मात्र यात त्यांना यश आले नाही. कॅप्टन यांचे समर्थक राणा गुरमीत सिंग सोधी यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. (Lok Sabha Election 2024)

परनीत कौर यांच्यासह भाजपाच्या पाच उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या गुरुवारी पटियाला येथे पोहोचले होते. मोदींनी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करताच सर्वांना कॅप्टनची आठवण झाली. ४२ वर्षात म्हणजेच चार दशकांत पहिल्यांदाच कॅप्टन निवडणुकीच्या मैदानात नाहीत. (Lok Sabha Election 2024)

पंजाबच्या लोकांना ८१ वर्षीय कॅप्टनला फक्त बघायचे नाही तर त्यांना ऐकण्याची इच्छा आहे. विशेषत: तेव्हा जेव्हा परनीत कौर यांच्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कॅप्टनची प्रतिमा नेहमीच राष्ट्रीय नेता आणि राष्ट्रीय प्रश्नांवर निर्भयपणे बोलणारा अशी राहिली आहे. त्यासाठी त्यांना पक्षाच्या पलीकडे जावे लागले तरी त्यांना कधी मागे बघितले नाही. ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंजाब विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. यादरम्यान पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली. ४१ जवान हुतात्मा झाले. १९६३ ते १९६६ या काळात भारतीय सैन्यात सेवा बजावलेले कॅप्टन हे पाहून खूप व्यथित झाले. त्यांनी विधानसभेच्या पटलावरच ही मागणी मांडली की जर त्यांनी आमच्या ४१ जवानांना मारले असेल तर आम्ही त्यांच्या ८२ लोकांना मारले पाहिजे. (Lok Sabha Election 2024)

कॅप्टन सैनिकांच्या पाठीशी उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीय लष्कराने बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला तेव्हा कॅप्टन हे काँग्रेसचे पहिले ज्येष्ठ नेते होते ज्यांनी त्याला पाठिंबा दिला होता. यासाठी त्यांनी काँग्रेस हायकमांडचे आवडते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी टक्कर घेण्यात हयगय केली नाही. त्यावेळी इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि नवज्योतसिंग सिद्धू क्रिकेटपटू म्हणून त्यांच्या राज्याभिषेकाला गेले होते. इम्रान खान यांनी सिद्धूला राज्याभिषेकासाठी निमंत्रण दिले होते तेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते की, सिद्धूने तिथे जाऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे. हवाई हल्ल्यानंतर जेव्हा सिद्धू यांचा सूर पाकिस्तानबाबत मवाळ होता, तेव्हा कॅप्टन म्हणाले होते, तो क्रिकेटर आहे आणि मी सैनिक आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.