लोकसभा निवडणुकीत इंडि आघाडीला (India Alliance) बहुमत मिळाल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत एनडीए (NDA) आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी राजधानी दिल्लीत संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली, आणि त्यात सर्वांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान, युतीचे भागीदार तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पंतप्रधान म्हणून मान्यता दिली आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. या बैठकीत सर्व एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली आहे. यावेळी अमित शाह, नितीन गडकरी, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह आदी नेत्यांनी संसदीय दलाचे नेते म्हणून पाठिंबा दिला. यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. (Lok Sabha Election 2024)
(हेही पाहा – PUNE शहरातील अधिकृत होर्डिंग्जचा फोटो, अहवाल सादर करा; आकाशचिन्ह विभागाने दिले ‘हे’ आदेश)
१० वर्षात भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे
एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या प्रस्तावाला मंजुरी देताना चंद्राबाबू नायडू यांना संबोधित करताना त्यांनी दावा केला की, गेल्या १० वर्षांत भारतात मोठा बदल झाला असून भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. नायडू पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा वेग असाच सुरू राहील आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत यावेळी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. असे विधान चंद्राबाबू नायडू यांनी केले. (Lok Sabha Election 2024)
(हेही पाहा – Israel–Hezbollah Conflict : इस्रायलशी थेट युद्ध करण्यास तयार; हिजबुल्लाची धमकी)
दरम्यान सत्तास्थापनेच्या अगोदर इंडि आघाडीने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याकडे पाठिंब्यासाठी संपर्क साधल्याची चर्चा आहेत. मात्र चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एनडीएमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. यावेळी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापेनेच्या आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीकडे येतील, या आकांक्षांवर पाणी फेरलं आहे. असे स्पष्ट चित्र दिसून येते. ()
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community