Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्राबाहेर कुठे गोंधळ आणि वादावाद

200
Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्राबाहेर कुठे गोंधळ आणि वादावाद

लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघांच्या मतदानाच्या दिवशी कुठे गोंधळ तर कुठे वादावाद पहायला मिळाले. ईशान्य मुंबई आणि वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये उबाठा शिवसेनेकडून चक्क डमी मतदान मशिनचा वापर करून मतदारांना कुठले आणि कुणाला मतदान करायचे याचे प्रात्यक्षिक देत होते. त्यामुळे डमी मशिनचा वापर टेबलवर ठेवून मतदारांना आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करणे योग्य नसल्याने या भागातील काही मतदान केंद्रांमध्ये पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाच झाल्याचे पहायला मिळाले. (Lok Sabha Election 2024)

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू तसेच विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याची घटना घडली. उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून १०० मीटर बाहेर डमी मतदान मशीन टेबलवर ठेवून मतदारांना कुठे मतदान करायचे हे सांगत होते. मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करता येते, परंतु त्यासाठी डमी मतदान यंत्र वापरता येत नसल्याने पोलिसांनी उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गाडीत बसवले होते. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी सुनील राऊत तिथे पोहोचले आणि त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सुनील राऊत यांनी आम्ही मतदारांनामध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करत होतो, असा दावा केला असला तरी अशाप्रकारे डमी मशिन वापरण्याचे अधिकार नसल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, पण त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून दिले. (Lok Sabha Election 2024)

कुलाब्यात नार्वेकर विरोधात ठाकरे गटाची घोषणाबाजी

दक्षिण मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदार संघात राडा झाल्याची माहिती समोर आली. राहुल नार्वेकर हे म्युनिसिपल सेकंडरी स्कूलमध्ये आढावा घेण्यास गेले असता नार्वेकर यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते, पण पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले गेले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – आठ वेळा बोगस Voting झालेल्या मतदान केंद्रावर पुन्हा होणार मतदान)

आरे कॉलनीतील मतदान केंद्रावर अनियमितता डेअरी बुथवर

आरे कॉलनीतील मतदान केंद्रामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आरे कॉलनीतील मतदान केंद्रांमध्ये डमी मतदान मशिनद्वारे उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कुणाला मतदान करायचे आणि कुठले बटन दाबायचे हे सांगत होते. त्याला म्हात्रे यांनी आक्षेप घेत याविरोधात कारवाईची मागणा केली आहे. याबाबत प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हात्रे, उबाठा शिवसेना निवडणूक हरणार आहे हे आता त्यांना कळून चुकले त्यामुळेच मशिनचे कुठले बटन दाबा हे सांगण्यासाठी ते डमी मशिन घेऊन बसले होते. आता हे काय चालले असा थेट सवालच त्यांनी उबाठा शिवसेनेला करत यांच्या पक्षाने प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन याबाबत टीका करत आहेत मग तुमचे लोक काय करत आहेत, याचेही उत्तर द्या असेही आव्हान दिले आहे. ही तुमची दादागिरी नाही का? तुम्ही अन्यायाची भाषा करता मग तुमची लोक काय करता असा सवाल करत याला आपली परवानगी आहे का? तुमचा उमेदवार काय करतो, तुम्ही काय करता असाही सवाल म्हात्रे यांनी केला. दरम्यान या मतदान केंद्रात आलेले शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांना उबाठा शिवसेनेने विरोध करत परत पाठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदानाचा प्रक्रियेत विलंब होऊ नये म्हणून वायकर सर्वांचा मान राखत परत गेले अशीही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. (Lok Sabha Election 2024)

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. आयोगाने योग्य नियोजन न केल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मतदान केंद्रावर सुविधा नसल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. सगळे उन्हात उभे होते. पंखे सुध्दा लावण्यात आले नाही. एक दोघांना उष्माघाताचा त्रास झाला, पाण्याचीही सोय नव्हती सावलीत कुठे उभे राहण्याची सुविधा नव्हती असे आदित्य ठाकरे म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.