लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. १ जून रोजी सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जातो आहे. तर देशात इंडि आघाडीचं सरकार येईल, असं विरोधकांचे म्हणणं आहे. अशातच मध्यप्रदेश काँग्रेसने (Congress) निकालापूर्वीच अतिउत्साहीपणा दाखवला आहे. १ क्विंटल लाडूची ऑर्डरही देण्यात आल्याची माहिती आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा –West Bengal EVM: पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू होताच जमावाने EVM पाण्यात टाकले; पहा धक्कादायक व्हिडिओ)
विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता. त्यापूर्वी २०१४ मध्ये काँग्रेसला केवळ २ जागा मिळाला होत्या. २०२३ च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. असे असतानाही आता काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसने निकालाच्या दिवसासाठी १ क्विंटल लाडूची ऑर्डर दिली आहे. तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भोपाळला पोहोचण्यासाठी रेल्वेचे तिकीटही बूक केले आहे. (Lok Sabha Election 2024)
मध्यप्रदेशमध्ये लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) एकूण २९ जागा आहेत, त्यापैकी २७ जागांवर काँग्रेसने निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला १० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जातो आहे. याशिवाय मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनीही काँग्रेसला दुहेरी संख्येत विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा –Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेवरील ५३४ फेऱ्या रद्द! ३७ मेल-एक्स्प्रेस रद्द)
यासंदर्भात बोलताना मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफीज म्हणाले, “विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी भोपाळमध्ये पोहोचण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी रेल्वेच्या तिकीटही बूक केल्या आहेत. तसेच १ क्विंटल लाडूची ऑर्डरही देण्यात आली आहे. हा जल्लोष केवळ मध्यप्रदेशपुरता मर्यादित नसून देशभर होणार आहे. कारण देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.” असं ते म्हणाले. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community