- सुजित महामुलकर
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांना प्रचारासाठी कोणतेही मुद्दे राहिले नसल्याने मतदारांना ‘पैसे घ्या आणि मतदान करा’ असा अजब सल्ला दिला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) मावळ आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अशी विधाने करणे हे आचारसंहितेचे उल्लंघनच आहे, अशी कबुलीच देऊन टाकली. (Mahavikas Aghadi)
पैसे घ्या, मतदान ‘मविआ’ला करा
मावळ मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठाचे संजय वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका जाहीर सभेत मतदारांना अजब सल्ला दिला. “मी सगळ्यांना सांगेन की, जे काही ते पैसे वाटत आहेत, ते पैसे आपण घ्यावे आणि मतदान मात्र महाविकास आघाडीला करायचं, अशी भूमिका आपण घेतली पाहिजे,” असे वक्तव्य त्यांनी केले. (Mahavikas Aghadi)
‘लक्ष्मी’ स्वीकारा, मतदान करा
दुसरीकडे, वडेट्टीवार यांचे विधानसभा क्षेत्र ज्या लोकसभा मतदार संघात येते त्या चंद्रपूर मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनीही महाविकास आघाडीच्या चंद्रपूर येथील इंपेरीयल पॅलेस येथे आयोजित एका मेळाव्यात ‘लक्ष्मी स्वीकारा आणि मतदान करा’ असे विधान केले. विशेष म्हणजे काँग्रेस राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे या मेळाव्याला उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच धानोरकर बोलत होत्या. (Mahavikas Aghadi)
वडेट्टीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून त्यांच्या मुलीला काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांना तिकीट मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा मतदार संघात होत आहे. (Mahavikas Aghadi)
(हेही वाचा – Solar Eclipse 2024 : वर्षातल्या पहिल्या सूर्यग्रहणाचा आदित्य एल-१ होणार परिणाम, वाचा शास्त्रज्ञ काय म्हणतात)
निवडणूक आयोग किती गांभीर्याने बघते?
आज सोमवारी ८ एप्रिलला वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना वाघेरे यांचे वक्तव्य अशी वक्तव्ये आचारसंहितेचा भंग करणारी असल्याची कबुली दिली. “असे कुणी म्हणू नये. पैशाचा वाटा घ्या, हे म्हणणेसुद्धा आचारसंहितेचे उल्लंघनच आहे. कुणी असे वक्तव्य करण्याची गरज नाही. पण निवडणूक आयोग आता अशा व्यक्तव्याकडे किती गांभीर्याने बघते? की ते फक्त विरोधकांकडेच बघते आणि सत्ताधाऱ्यांकडे नाही, हे दिसेल,” असे मत व्यक्त केले. (Mahavikas Aghadi)
भाजपा तक्रार करणार
याबाबत भाजपाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधला असता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मावळ आणि चंद्रपूर या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (Mahavikas Aghadi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community