लोकसभा निवडणुकीचे ५ टप्पे पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होते, तर महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा २० मे रोजी पार पडला. लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान बारामती, अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आले होते, मात्र हे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. (Lok Sabha Election 2024)
मतदारसंघांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या वतीने बुथ हायजॅक करण्यात आल्याचा आरोपदेखील शरद पवार गटातील नेत्यांनी केला होता. या प्रसंगाचे काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते, मात्र हे व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 चे नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे, असा दावादेखील निवडणूक आयोगाने केला आहे. (Lok Sabha Election 2024)
या संदर्भात निवडणूक आयोगाने एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. निवडणूक आयोग म्हणाले की, ‘काही व्यक्ती निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचवणारी कृती करताना, आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत छेडछाड करत असल्याच्या इतर राज्यांमधील जुन्या चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चित्रफिती लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे.’ (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – CRIME: सावधान ! ‘धूम स्टाईल’ मागे पडेल, अशी झाली चोरी; पहा व्हिडिओ)
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओची तपासणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काही व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर पोस्ट केले होते तसेच काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओची तपासणी निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये हे व्हिडिओ इतर राज्यातील जुने असल्याचे निदर्शनास आले असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community