Lok Sabha Election 2024 : जागावाटपावरून महायुती आणि आघाडीत वाद कायम…..!

Lok Sabha Election 2024 : अजूनही घोळ काही संपत नाही.......?

205
Lok Sabha election 2024 :मतदानासाठी 7 मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी
Lok Sabha election 2024 :मतदानासाठी 7 मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी
देशभरात लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही महाराष्ट्रात मात्र जागावाटपावरून अजूनही काही जागांवरून आघाडी व महायुती (Mahayuti) मध्ये निर्माण झालेला घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. (Lok Sabha Election 2024)
त्याचे कारण महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली, भिवंडी व दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघावरून सुरू झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेने मित्र पक्षांना विचारात न घेता परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याने उध्दव ठाकरे यांनी हि जागा यंदा काँग्रेसला सोडावी असे मानणारा एक आग्रही गटाने पक्षात उचल घेतली आहे. मात्र त्यात मजेशीर गोष्ट म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हि जागा वाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने तिथे त्यांच्या पक्षाने उमेदवारी लढवावी असे काहीसे जाहीरपणे आपले मत मांडले आहे. (Lok Sabha Election 2024)
जरी काहीही असले तरी आज घडीला कोणत्याही जाहीर केलेल्या जागेवरून उध्दव ठाकरे माघार घेण्याची कोणताही शक्यता आज तरी सुतराम दिसत नाही.आता जी गत सांगलीची तीच गत दक्षिण मध्य मुंबईची आहे. या ठिकाणाहून आजपर्यंत स्व.सुनिल दत्त यांनी व नंतर त्यांची कन्या प्रिया दत्त यांनी प्रत्येक लोकसभा निवडणूका (Lok Sabha Election 2024) लढवून तेथून सलग खासदारकी काँग्रेसकडे राखण्यात यश मिळविल्याने किमान ही तरी जागा ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसला जागा सोडेल या आशेवर काँग्रेसचे नेते होते. मात्र येथेही त्यांच्या पदरात निराशाच पडली असून येथून ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. तरीही तब्बल सहा लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha constituency) असलेल्या मुंबईत काँग्रेसला ठाकरे यांनी किमान एकतरी जागा द्यावी हा काँग्रेसचा हट्ट काही केल्या कमी होताना दिसत नाही. (Lok Sabha Election 2024)
आता जी गत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आहे तसाच काहीसा पेच हा महायुती (Mahayuti) मध्ये रत्नागिरी सिंधुदूर्ग, ठाणे, कल्याण, पालघर, सातारा व नाशिक या चार जागांवरून निर्माण झाला आहे. कारण ठाणे या परंपरागत मतदारसंघावर यावेळी मित्र पक्ष भाजपा (BJP) नेत्यांनी उभा दावा केला आहे. तीच गत रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाची येथेही भाजपाने आपला दावा केला आहे. कारण यापैकी ठाणे मतदारसंघात (Thane Constituency) भाजपाने (BJP) गेल्या वर्ष दिड वर्षापासून खालपासून वरपर्यंत सगळी यंत्रणा चोखपणे राबवली आहे. त्यातच रत्नागिरी सिंधुदूर्ग या लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अलर्ट मोडवर ठेवले आहे. त्यामूळे महायुतीमध्ये (Mahayuti) असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वपक्षाच्या खासदार व मित्रपक्षांचा प्रचंड दबाव आहे. आणि केवळ या आग्रहापोटी दोन्ही पक्षातील जागावाटपाचा घोळ काही संपण्याचे नाव घेत नाही. आणि म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, अजुनी घोळ संपत नाही. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.