Lok Sabha Election 2024: पुण्यात जिवंत मतदाराला दाखवले मृत; भवानी पेठेतील प्रकाराने खळबळ

भवानी पेठेतील या मतदार केंद्रांवर जिवंत मतदारांची नावे मृत असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत.

161
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे सप्टेंबरमध्ये वाजणार बिगुल ?

‘पुणे तिथे काय उणे’ असे जरी पुण्याला मिश्किलीने म्हटले जात असले तरी पुण्यात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. देशभरात लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीसाठी मतदान (Pune Voting) सुरू आहेत. राज्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात मतदान होत असले तरी पुण्यात एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी उत्साहाने गेलेल्या मतदाराला, मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. 

(हेही वाचा – IPL 2024 Rohit Sharma : रोहित शर्मा कोलकात्याच्या प्रशिक्षकांबरोबर दिसल्यावर चर्चेला उधाण)

देशभारत १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी (18th Lok Sabha Elections) मतदान सुरू आहे. दरम्यान राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पुण्यातील मतदान केंद्र १८८ (Polling station Pune no 188) च्या मतदार यादीमध्ये जिवंत व्यक्तीचा मृत्यू असा उल्लेख असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तर अनेक ठिकाणी मतदाराचे मतदार यादीतून नावे गायब आहेत. मात्र भवानी पेठेतील या मतदार केंद्रांवर जिवंत मतदारांची नावे मृत असल्याची नोंद आढळून आल्या आहेत.

(हेही वाचा – CSMT Subway : नूतनीकरणाच्या कामाची ‘स्टेप’ चुकली; नवीन लाद्यांवर आताच पडू लागलेत प्रवासी)

भवानी पेठेतील मतदान केंद्र क्र. १८८ (Pune Polling Station No. 188), महात्मा फुले पेठ, शाळा नंबर ९५, खोली नंबर २ येथे मतदान असलेल्या ५ जणांच्या बाबतीत मयत नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे या मतदाराना मयत असे नोंदल्याचे आढळल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले.   

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.