लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) जाहीर होण्याच्या आधीच मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अधिनिस्त कार्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळांवरील राजकीय नेत्यांची छायाचित्रे विनाविलंब काढून टाकावीत, अशा सूचना राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केद्रीय निवडणूक आयोगाने जानेवारीमध्येच मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या तसेच त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांच्या अधिकृत संकेतस्थवर कोणत्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास, ती विनाविलंब काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळावर छाननी समिती
लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आचारसंहितेच्या कालावधीत एखाद्या प्रस्तावास मान्यता देणे व कार्यवाही करणे, यासाठी संबंधित विभागाचा आग्रह असल्यास असे प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची छायाचित्रे आहेत. मंत्रालयीन विभागांच्या संकेतस्थळांवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री यांची छायाचित्रे आहेत. काही संकेतस्थळांवर मन्त्रयांबरोबर त्या विभागाच्या सचिवांचेही छायाचित्र आहे. यांतील राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढावी लागणार आहेत.
Join Our WhatsApp Community