लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. चार दिवसांत त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. (Lok Sabha Election 2024)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. यामुळे राज ठाकरेंचा महायुतीत सहभागी होणार की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे तसेच सोमवारी रात्री महायुतीची बैठक दिल्लीत होणार असून त्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : मुंबईतील सर्व होर्डिंग, पोस्टर, बॅनर तत्काळ हटवावे; चहल यांचे निर्देश )
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन जागांवर आग्रही असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यापैकी एक जागा दक्षिण मुंबई मतदारसंघ असल्याचं बोललं जात आहे, तर मनसेला जरी दोन लोकसभेला जागा न दिल्यास एक जणांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून देण्याची शक्यता तसेच विधानसभेत पण समाधानकारक जागा देण्याचेसुद्धा आश्वासन भाजप देऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक असणार असल्याचं दिसत आहे. याबाबत राज ठाकरे आणि आमची विचारधारा एकच आहे, मात्र योग्य वेळी निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्री शिंदेंनी मनसेबाबत सूचक विधान केले. यामुळे आगामी काळात मनसे महायुतीचा भाग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community