महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया चालू आहे. या मतदारसंघातील २६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी, (२० मे) सकाळपासून राज्यातील १३ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली, मात्र दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात २७.७८ टक्के% इतके मतदान झाले. मतदानाच्या संथ गतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी यांनी गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाकडे मतदानाची गती वाढवण्यासाठी विनंती केली आहे.
मुंबई तसेच परिसरात संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांवरून येत असल्याने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने त्यात तातडीने लक्ष घालून मतदानाचा वेग कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाकडे केली आहे.
(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : बंगळुरू संघाचा माजी दिग्गज खेळाडू ख्रिस गेलचा विराटसाठी खास संदेश)
Join Our WhatsApp Community