Lok Sabha Election 2024: निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे ‘विशेष लक्ष’ देणार – देवेंद्र फडणवीस

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान मंगळवारी ७ मे रोजी तर उर्वरित तीन लोकसभा मतदार संघाची निवडणूक १३ मे रोजी होत आहे.

153
Lok Sabha Election 2024: निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे 'विशेष लक्ष' देणार - देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित दिवसांत पक्षाच्या उमेदवाराचा अधिकाधिक प्रचार कसा करता येईल यासाठी रणनीती आखली जात आहे. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती, पुणे शहर, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे ७ आणि १३ मे रोजी मतदान होत आहे. (Lok Sabha Election 2024)

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान मंगळवारी ७ मे रोजी तर उर्वरित तीन लोकसभा मतदार संघाची निवडणूक १३ मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहरातील माजी नगरसेवक यांची एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या.कोरेगाव पार्क येथील एका मंगल कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : ‘विराट सलामीला आणि रोहित तिसऱ्या क्रमांकावर…’ माजी खेळाडूने हे काय सुचवले?)

पुणे महापालिका तसेच पुणे कॅन्टोन्मेंट भागातील नगरसेवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. भाजपाच्या शहरातील आमदार देखील या बैठकीला उपस्थित होते. शहराध्यक्ष सरचिटणीस उपाध्यक्ष सचिव तसेच राज्य पातळी संघटनेचे पदाधिकारीदेखील यावेळी हजर होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.