Lok Sabha Election 2024 : बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे नातू पंजाबमधून मैदानात

247
Lok Sabha Election 2024 : बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे नातू पंजाबमधून मैदानात
  • वंदना बर्वे

वडील यशवंत आंबेडकर यांच्या पराभवाचा हिशेब बरोबर करण्यासाठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे नातू भीमराव आंबेडकर यांनी पंजाबच्या होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून दंड थोपटले आहेत. १९६२ मध्ये याच मतदारसंघातून वडील यशवंत आंबेडकर यांनी निवडणूक लढविली होती. (Lok Sabha Election 2024)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन नातवंडांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमधून निवडणूक लढली आहे. (Lok Sabha Election 2024)

आता भीमराव यशवंत आंबेडकर हे पंजाबच्या होशियारपूरमधून निवडणूक लढत आहेत. हा मतदारसंघ अनुसचित जातीसाठी राखीव आहे. भीमराव आंबेडकर यांनी होशियारपूरमधून लढावे असा आग्रह धरला होता. जनतेच्या भावना लक्षात घेता भीमराव आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एस. के. भंडारी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Pune Car Accident प्रकरणाचं राजकारण करणाऱ्या राहुल गांधीना फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर!)

होशियारपूर मतदारसंघातून १६ उमेदवार रिंगणात

ग्लोबल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ते निवडणुकीच्या मैदानात असून गॅस-सिलेंडर हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. याशिवाय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तर समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन नातू लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रिब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यापाठोपाठ भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकरांनीही निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तिन्ही भावंडांनी एकाच निवडणुकीत लढण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Lok Sabha Election 2024)

भीमराव यशवंत आंबेडकर यांनी ग्लोबल रिपब्लिकन पार्टीतून पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना गॅस-सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या अंतिम म्हणजे सातव्या टप्प्यात एक जूनला मतदान होणार आहे. भाजपाने होशियारपूर मतदारसंघातून अनिता सोम प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे. आपने राजकुमार चब्बेवाल आणि काँग्रेसने यामिनी गोमर, शिरोमणी अकाली दलाकडून सोहन सिंह ठंडल आणि बसपाने रणजीत कुमार यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीने केलेल्या ‘या’ ट्विटची चर्चा, धक्कादायक माहिती उघड)

होशियारपूर लोकसभा मतदारसंघात इतके मतदार 

होशियारपूरमधील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे भीमराव आंबेडकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. होशियारपूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रातून निधी आणला जाईल, असेही ते म्हणाले. होशियारपूर लोकसभा मतदारसंघात १४ लाख ८५ हजार २८६ मतदार आहेत. यात सात लाख ६२ हजार पुरूष आणि सात लाख २३ हजार महिला आहेत. २०१४ मध्ये ९ लाख ६१ हजार २९७ मते पडली होती. होशियारपूरमध्ये गुरदासपुर आणि कपूरथला जिल्ह्याचा समावेश होतो. (Lok Sabha Election 2024)

भीमराव आंबेडकर यांचे वडील यशवंत आंबेडकर यांनी १९६२ मध्ये होशियारपूरमधून निवडणूक लढविली होती. तेव्हा १० हजार मताने त्यांचा पराभव झाला होता. यानंतर १९९६ मध्ये बसपा सुप्रिमो कांशीराम यांनी होशियारपूरमधून निवडणूक लढविली आणि कॉंग्रेसच्या उमेदवाराचा १० हजारापेक्षा जास्त मताच्या फरकाने पराभव केला होता. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.