Lok Sabha Election 2024: निवडणुकीमुळे फुलांच्या दरात वाढ, काय आहेत भाव? जाणून घ्या

199
Lok Sabha Election 2024: निवडणुकीमुळे फुलांच्या दरात वाढ, काय आहेत भाव? जाणून घ्या

यंदा लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू आहे. आतापर्यंत चौथ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. महाराष्ट्रातला पाचवा आणि शेवटचा टप्पा २०मे रोजी पार पडणार आहे. नेत्यांच्या प्रचारसभा, त्यांचे स्वागत करण्यासाठी, रॅली, दौरे याकरिता बाजारात फुलांची विक्री वाढली आहे. मागणीत वाढ झाल्यामुळे दरांतही वाढ झाल्याची माहिती फूलविक्रेते देतात.  (Lok Sabha Election 2024)

यंदा महाराष्ट्रात कडक उन्हाळा, पाणीटंचाई आणि त्यामुळे फूलपिकांना भर उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी न मिळणे, अशा समस्या फूलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेडसावत असल्या, तरी यंदा निवडणूक आणि लग्नसराई या कारणांमुळे फुलांची विक्री वाढली आहे. याचा परिणाम नियमित घरगुती पूजेसाठी किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी फुलांची खरेदी करणाऱ्या गिऱ्हाईकांवर होत आहे. त्यांना महागड्या दरात फुलांची खरेदी करावी लागत आहे. या दरात रोजच कमी-जास्त प्रमाणात बदल होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे फूलविक्रेत्यांना निवडणुकीच्या काळात सुगीचे दिवस आले आहेत.  (Lok Sabha Election 2024)

प्रत्येक कार्यक्रमाला जाताना बुके किंवा फुलांचा हार घेऊन जाण्याची प्रथा आहे. त्यामुळे दररोज हजारो किलो फुलांची गरज भासते. निवडणुकीपूर्वी गुलाब १०० ते १५० रुपये किलो होता. आता तो २०० रुपये किलो झाला आहे. सव्वादोनशे ते अडीचशे रुपये किलो भाव असलेला निशिगंध २५० ते ३०० रुपये किलो आहे. झेडुंची फुले ८० रुपये किलो होती आता या फुलांमध्ये १०० ते १५० रुपये इतकी वाढ झाली आहे. बुके आणि हारांचे दरही वाढले आहेत.

(हेही वाचा – Retail Inflation : एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई दर आटोक्यात, अन्नधान्याच्या किमती मात्र वाढल्या )

चॉकलेट बुकेचाही वापर
बाजारात फुलांची आवक कमी झाल्याने हार, बुके खरेदी करताना खिशाला मोठी कात्री लागत असल्याचे चित्र आहे. सजावटीसाठी झेंडुच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने झेंडूचेही दर वाढले आहेत. झेंडूच्या आणि विविध फुलांच्या हारांच्या मागणीचे प्रमाण वाढले आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचाराचा जोर वाढला आहे. त्यामुळे नेत्यांचे दौरे, रॅली आणि लहान-मोठ्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे तसेच विविध पक्षांची कार्यालये, शाखा, चौक सभा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा फुलांसोबतच चॉकलेट बुकेलाही पसंती आहे. अनेक जण फुलांचे बुके उपलब्ध झाले नाही किंवा असले तरीही चॉकलेट बुके देणे पसंत करत आहेत.

हार आणि बुके यांचे दर वाढले
उन्हाळ्याचे दिवस असल्याने निशिगंध, जरबेरा, डच, गुलाब ही फुले लवकर सुकतात. त्यामुळे ग्राहकांना ताज्या फुलांचे हार देण्यासाठी दररोज फुलांची गरज पडते. बाजारात फुलांची आवक कमी असून फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे हार आणि बुके यांचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत.

फुलांचे प्रकार आणि दर (प्रति किलो)
गुलाब – २०० रुपये
निशिगंध – २५० रुपये
मोगरा – ५०० रुपये
जरबेरा – १०० रुपये (१० नग)
डच गुलाब – ४०० रुपये (२० नग)
झेंडू – १०० रुपये

बुके व पुष्पहार दर
बुके – १५० ते २५० रुपये
व्हीआयपी बुके – ४५० ते ७५० रुपये
पुष्पहार – ५० ते १,५०० रुपये

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.