महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील ५ मतदार संघासाठी प्रचाराच्या तोफा शनिवार, १७ एप्रिल रोजी थंडावल्या आहेत. १९ एप्रिल रोजी या मतदार संघात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी देशभरात 102 मतदारसंघात मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला होता. आता या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे.
विदर्भातील या पाचही लोकसभा मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ठिकाणी सभा घेतल्या. यातील पहिली सभा चंद्रपूर, तर दुसरी सभा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये झाली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांची देखील एक सभा पार पडली. त्यासोबतच केंद्रीय मंत्री अमित शाह यांची एक सभा झाली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक सभा पार पडली. (Lok Sabha Election 2024)
भाजप विरुद्ध काँग्रेस
या पाचपैकी फक्त रामटेक मतदारसंघात काँग्रेस व शिंदे सेनेची लढत होणार आहे. उर्वरित चारही मतदारसंघांत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरशीची लढत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान होत असतानाच राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. त्यामुळे या वेळी राज्यातील लोकसभा निवडणुकीकडे (Lok Sabha Election 2024) सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community