नागपूर (Nagpur) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) शुक्रवारी (१९ एप्रिल) सुरू झालेल्या मतदानात इव्हीएम मशीन बंद (EVM machine) पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभं राहण्याची वेळ आली. हा प्रकार दिघोरी येथील जयमाता शाळा या मतदान केंद्रावर झाला. येथील बुथ क्रमांक २४६ येथे नागरिक सकाळी ६.३० वाजतापासून रांगेत लागले होते. मतदान ७ वाजता सुरू होणार होते. परंतु इव्हीएम मशीन सुरूच होत नव्हते. लोकांमध्ये संताप वाढला होता. माजी नगरसेवक विजय झलके यांनी यावर आक्षेप घेतला. (Lok Sabha Election 2024)
इव्हीएम मशीन बदलली
अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचण असल्याचे सांगत इव्हीएम मशीन बदलली. सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी मतदान सुरू झाले. याच केंद्रावरील बुथ क्रमांक २४८ मध्येही सकाळी ७.३० वाजता अचानक इव्हीएम मशीन बंद पडले. मतदान रखडल्याने लोकांनी गोंधळ घातला. १५ मिनीटानंतर ७ वाजून ४५ मिनीटांनी पुन्हा मतदान सुरू झाले. (Lok Sabha Election 2024)
हे पहा –
Join Our WhatsApp Community