लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला पार पडणार आहे. यासाठी बुधवार, (२० मार्च) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २१ राज्यांसह एका केंद्राशासित प्रदेशातील सर्वाधिक १०२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचाही समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्किम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये पहिल्या आणि एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
(हेही पहा – ISRO: चांद्रयान-३ मोहिमेसाठी इस्रोला मिळाला ‘एव्हिएशन वीक लॉरेट्स’ पुरस्कार )
पहिल्या टप्प्यासाठी बुधवार, २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे, तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २७ मार्च आहे. त्यानंतर उरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी २८ मार्चला होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला पार पडणार आहे, तर निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान
या सर्व राज्यांमध्ये मिळून १०२ मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community