Lok Sabha Election 2024: ‘लव्ह जिहादची पहिली घटना झारखंडमध्ये झाली’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झामुमो-काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

243
Lok Sabha Election 2024: ‘लव्ह जिहादची पहिली घटना झारखंडमध्ये झाली’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झामुमो-काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

लोकसभा २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी असून येत्या १ जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, सातव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार सभांचा जोर शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी झारखंडमधील दुमका (PM Narendra Modi Dumka in Jharkhand) येथे जनतेला संबोधित केले. तसेच झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) वर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘झारखंडच्या नेत्यांना जो पैसा मिळत आहे तो दारू घोटाळा, निविदा घोटाळा आणि खाण घोटाळ्यातून येत आहे. साहिबगंज जिल्ह्यात १००० कोटी रुपयांचा खाण घोटाळा उघडकीस आला आहे. असा आरोप ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.  (Lok Sabha Election 2024)

झारखंड सरकारवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘या लोकांनी जमिनी हडपण्यासाठी आई-वडिलांची नावे बदलली. लष्कराची जमीनही लुटली गेली. आता तुम्हाला झारखंडमधून वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून मुक्त करावे लागेल. झारखंड मुक्ती मोर्चाच्या लोकांनी तुमच्या ताटातील रेशन लुटले आहे. ‘हर घर जल’ (Har Ghar Jal Yojna) योजनेतही घोटाळा केला याची त्यांना लाज वाटत नाही. या लुटीत स्वत: झारखंड मुक्ती मोर्चाचा सहभाग असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. पण पंतप्रधान मोदी गरिबांच्या अन्नपाण्याला हात लावू देणार नाहीत. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या विषयावरील कोट्स!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘४ जूननंतर भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाई तीव्र केली जाईल, ही मोदींची हमी आहे. भाजप दलित, वंचित आणि आदिवासींना समर्पित आहे. आदिवासी कल्याणाच्या आर्थिकमदतीमद्धे आम्ही चौपट वाढ करू. तसेच आदिवासी भागात खनिजाचे पैसे तुमच्या मुलांवर खर्च व्हावेत यासाठी आम्ही कायदा केला आहे. आपले सरकार भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिन साजरा करते. मात्र काँग्रेसच्या (Congress) लोकांनी या योजनांना विरोध केला आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत मांडले. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.