सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी (Congress) २०२४ ची लोकसभा निवडणूक खरं तर खुप महत्त्वाची समजली जात आहे. मात्र काँग्रेस इंडी आघाडी सोबत एकत्र निवडणूक लढविणार असल्यामुळे इतिहासात प्रथमच काँग्रेस ४०० पेक्षाही कमी जागांवर लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. इंडी आघाडीचा (I.N.D.I. Alliance) फटका पक्षालाच बसला असल्याची चर्चा काँग्रेस मुख्यालयात दबक्या आवाजात सुरु आहे. (Lok Sabha Election 2024)
कारण लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) इतिहासात प्रथमच काँग्रेस ४०० पेक्षा कमी जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावातामुळे २०१४ पासून काँग्रेसची वाताहात झाली आहे. पक्षाला २०१४ मध्ये पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी म्हणजे केवळ ४४ जागा मिळाल्या. त्यानंतर २०१९ मध्येही केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसने ४०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवले होते. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – भाजपाचे उमेदवार Ram Satpute आणि Ranjit Singh Naik-Nimbalkar यांनी भरले उमेदवारी अर्ज)
काँग्रेसचे आतापर्यंत २६६ उमेदवार जाहीर
२०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) आतापर्यंत २६६ उमेदवार जाहीर केले आहेत. हा आकडा फारतर ३४०-३५० पर्यंत वाढू शकतो. असे झाले तर पहिल्यांदाच काँग्रेस ४०० हून कमी लोकसभा जागांवर निवडणूक लढेल. इंडी आघाडीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तमिळनाडू, हरियाणा आदी राज्यांमध्ये मित्रपक्षांना अधिक जागा मिळाल्या आहेत. परिणामी, काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)
काँग्रेसने (Congress) १९५२ पासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत सर्वाधिक ५२९ उमेदवार १९९६ च्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावेळी पक्षाला केवळ १४० जागांवर विजय मिळाला होता. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४६३ तर २०१९ मध्ये ४२१ मतदारसंघात उमेदवार दिले होते. अनुक्रमे ४४ आणि ५२ जागांवर विजय मिळाला होता. (Lok Sabha Election 2024)
उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत काँग्रेस (Congress) ६७ जागांवर उमेदवार उतरवले होते. या वेळी पक्षाला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्येही या वेळी काँग्रेस (Congress) जेमतेम २० जागांवर निवडणूक लढू शकते. मागील वेळी ४१ उमेदवार रिंगणात होते. या वेळी उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्याने पक्षावर लोकसभेच्या इतिहासात सर्वात कमी जागांवर लढण्याची वेळ आली आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community