Lok Sabha Election 2024 : माजी पंतप्रधानांचे कुटुंबीय भाजपावासी

296
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू

एकवेळ अशी होती की, काँग्रेस पक्षात प्रवेश मिळविण्यासाठी रांगा लागल्या होत्या. मात्र आता परिस्थिती पूर्ण बदलली असून काँग्रेस मधून बाहेर पडणाऱ्यांच्या रांगा दिसून येत आहे. अगदी देशातील माजी पंतप्रधान यांचे कुटुंब देखील याला अपवाद नसून बहुतांश भारतीय जनता पक्षात सहभागी झाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

आतापर्यंत देशात १४ पंतप्रधान झाले आहेत, ज्यात गांधी परिवारातील तिघांचा समावेश आहे. यात गांधी परिवाराचा अपवाद वगळता इतर सर्व पंतप्रधान व उपपंतप्रधानांच्या कुटुंबातील किमान एक सदस्य तरी सध्या भाजपामध्ये किंवा एनडीएच्या घटक पक्षात सहभागी आहे. माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे पुत्र रणजितसिंह चौटाला यांचे नावही यात समाविष्ट झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

त्यांनी भाजपात नुकताच प्रवेश केला. पक्षाने त्यांना हरियाणातील हिस्सारची उमेदवारी दिली. याशिवाय लालबहादूर शास्त्री व पी. व्ही. नरसिंह राव या दोन माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील सदस्यही एनडीएत आले आहेत. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर २०१९ मध्ये समाजवादी पक्षातून भाजपात आले. ते राज्यसभा खासदार आहेत. एच. डी. देवेगौडा यांचा जेडीएस हा पक्षही सध्या एनडीएत सहभागी आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – IPL 2024 : विराट आणि गौतम गंभीरने जुनं वैमनस्य टाकलं मागे )

माजी पंतप्रधान व जनता दलाचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते चौधर चरणसिंह यांचा मुलगा व आरएलडीचे संस्थापक अजितसिंह यांनी एनडीए व काँग्रेस अशा दोन्ही सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले होते. मागच्या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांनी एनडीएत जाणे पसंत केले. यापूर्वी ते इंडिया आघाडीचे सदस्य होते. जयंत एनडीएत येण्यापूर्वी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न ​पुरस्कार जाहीर झाला होता. (Lok Sabha Election 2024)

शास्त्रीजींचे नातलग वेगवेगळ्या पक्षात

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षात विखुरले​​​​​​​

ज्येष्ठ पुत्र हरिकृष्ण शास्त्री काँग्रेससोबत. दुसरे पुत्र सुनील शास्त्री काँग्रेसमधून भाजपत गेले होते.

अनिल शास्त्री १९८० च्या दशकात जनता दलात सक्रिय होते, आता ते काँग्रेस पक्षात आले आहेत. शास्त्रीजींच्या नातवांपैकी उत्तर प्रदेशातील माजी मंत्री सिद्धार्थनाथ सिंह, त्यांची मुलगी सुमन सिंह यांचा मुलगा सध्या भाजपत सहभागी आहे.

हरिकृष्ण शास्त्री यांचा मुलगा विभाकर हे २००९ मध्ये काँग्रेसकडून लोकसभा लढले. फेब्रुवारीत भाजपत गेले. सुनील शास्त्री यांचा मुलगा विनम्र रालोदमध्ये आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.