Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये १३ जागांसाठी चौरंगी मुकाबला

शिअद-भाजपा युती तुटली, कॉंग्रेस-आपसुध्दा स्वतंत्र लढणार

152
Lok Sabha Election 2024 : सातव्या टप्प्यात कुणा-कुणाची आहे अग्निपरीक्षा?
  • वंदना बर्वे

भाजपा आणि शिरोमणी अकाली दलची युती तुटल्यामुळे पंजाबचा मुकाबला चौकोनी झाला आहे. राजकीय पक्षांचे महत्व कमी झाले असून संपूर्ण निवडणूक आता उमेदवारांच्या चेहऱ्यांच्या अवतीभोवती केंद्रित झाली आहे. एका पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या नेत्याने दुसऱ्या पक्षात जावे आणि त्या पक्षाच्या तिकीटवर निवडणूक लढावी हा प्रकार पंजाबमध्ये पहिल्यांदाच बघायला मिळतो आहे. (Lok Sabha Election 2024)

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. पंजाबमध्ये निवडणूक सर्वात शेवटी अर्थात सातव्या टप्प्यात १ जून रोजी होणे आहे. भाजपा आणि शिरोमणी अकाली दलाची मैत्री तुटली आहे. तर, कॉंग्रेस आणि आपची आघाडी झाली असली तरी ती पंजाबसाठी नाही. यामुळे चारही पक्ष मैदानात आहेत. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी उत्सुकताही वाढत आहे. यावेळची निवडणूकही पक्षांऐवजी चेहऱ्यांवर केंद्रित आहे. मोठ्या चेहऱ्यासाठी प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाने चारशेचे लक्ष्य ठरविले आहे. मात्र, शिरोमणी अकाली दल अस्तित्वाची लढाई लढत आहे. आम आदमी पक्ष देखील लोकसभेत आपले खाते पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपला गमावलेला जनाधार पुन्हा मिळवून राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत पक्ष बनण्याचा प्रयत्न करत आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : जाहिरात फलकाचा राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण!)

सर्व पक्षांचे लक्ष २०२७ वर आहे

सध्याची निवडणूक लोकसभेची असली तरी सर्वांचा डोळा आहे तो २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर. २०२४ च्या माध्यमातून २०२७ सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा आहे. (Lok Sabha Election 2024)

पंजाबमध्ये असे कधीच घडले नाही

एका पक्षाने उमेदवाराला तिकीट दिले आणि तो दुसऱ्या पक्षात गेला असे पंजाबच्या इतिहासात कधीच घडले नाही. एक विद्यमान आमदार राजीनामा देतो आणि दुसऱ्या पक्षाचा उमेदवार होतो. तीन वेळा खासदार राहिलेल्या रवनीत बिट्टू आणि चार वेळा खासदार राहिलेल्या प्रनीत कौर यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपाचे उमेदवार झाले. (Lok Sabha Election 2024)

बसपा एक्स फॅक्टर सिद्ध होईल का?

पंजाबमध्ये चौरंगी लढत झाली तरी बहुजन समाज पक्ष एक्स फॅक्टर म्हणून पुढे येईल हे नक्की. आरक्षित जागांवर बसपाचा स्वतःचा जनाधार आहे. जालंधर आणि होशियारपूर अशा जागा आहेत जिथे बसपासोबत नेहमीच स्पर्धा असते. बसपाची फिरोजपूरमध्येही चांगली व्होट बँक आहे. त्यामुळे आरक्षित जागांवर बसपाला कमी लेखायला कोणताही पक्ष तयार नाही. (Lok Sabha Election 2024)

देशातील तमाम राजकीय पंडितांचे भाकित खोटे ठरवित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने २०२२ मध्ये पंजाबची एकहाती सत्ता मिळविली होती. सध्या ११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत आपचे ९२ आमदार आहेत. याशिवाय, कॉंग्रेसचे १८, शिरोमणी अकाली दल चार, भाजपा दोन आणि एक अपक्ष आमदार आहे. (Lok Sabha Election 2024)

विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे बारा हत्तींचे बळ संचारलेला आम आदमी पक्ष आता लोकसभेच्या निवडणुकीत सर्व १३ जागांवर विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीने मैदानात उतरला आहे. पंजाबमधील सर्व १३ जागांसाठी शेवटच्या सातव्या फेजमध्ये अर्थात १ जून रोजी मतदान होणे आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.