Lok Sabha Election 2024 : महायुतीचा पेच कायम ८ जागांवर अजूनही निर्णय नाही

Lok Sabha Election 2024 : महायुतीचे तिन्ही बडे नेते आज मुंबईमध्ये नसल्याने यावरती तोडगा उद्याच निघू शकतो असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

222
Rahul Gandhi यांचा अमेरिका दौरा महायुतीसाठी लाभदायक?
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला १२ एप्रिलपासून सुरुवात होत असताना अजूनही महायुतीच्या जागांचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई या ३ जागा तसेच ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा ८ जागांवर अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेले नाही. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागावाटप पूर्ण झाले असताना महायुतीच्या जागांचे भिजत घोंगडे कशासाठी, असा सवाल आता महायुतीचे कार्यकर्ते करीत आहेत. (Lok Sabha Election 2024)
राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रचाराने जोर धरला आहे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची चंद्रपूरमध्ये पहिली, तर रामटेकमध्ये बुधवारी दुसरी सभा पार पडली. महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार निश्चित होऊन ते प्रचारालाही लागले असताना महायुतीच्या काही जागांचा पेच मात्र अद्याप कायम आहे. जागावाटपात सुरुवातीला महायुतीने आघाडी घेतली होती, मात्र आघाडीने कासवगतीने वाटचाल करीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांचे जागावाटप पूर्ण केले आहे. (Lok Sabha Election 2024)
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी (South Mumbai Lok Sabha Constituency) भाजपा इच्छुक असून शिंदेंच्या शिवसेनेनेदेखील या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेकडून तगड्या उमेदवाराचे नाव अद्याप पुढे आलेले नसताना भाजपने राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावासाठी जोर लावला आहे. ही जागा नेमकी कुणाला सोडायची यावर अजूनही भाजपा आणि शिंदे शिवसेनेत खलबते सुरू आहेत. (Lok Sabha Election 2024)
ठाणे लोकसभा (Thane Lok Sabha) मतदारसंघ भाजपाने (BJP) आपल्या ताब्यात राहवा यासाठी प्रयत्न सुरू केले असून यावरून वाटाघाटी अजूनही आडून आहेत. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून देखील हा आपला गृह जिल्हा असल्याकारणाने ठाण्याची जागा ही आपणच लढणार असा दावा त्यांच्या नेत्यांकडून केला जात आहे. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील पालघर लोकसभा मतदारसंघ हा देखील आपलाच असून या ठिकाणी आपलेच वर्चस्व राहावे यासाठी शिंदे गटाकडून रस्सीखेच अजूनही सुरू आहे. (Lok Sabha Election 2024)
तर दुसरीकडे संभाजीनगरच्या जागेवरून देखील ओढाताण अजूनही थांबलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी मागे या ठिकाणी सभा घेत या ठिकाणाहून एक कमळ मोदीजींसाठी असा जाहीर उल्लेख सभेतून केला होता. परंतु संभाजीनगर मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेकडून या ठिकाणी दावा केला जात आहे. असाच काहीसा प्रकार रत्नागिरी, सिंधुदुर्ग च्या जागेवरून देखील सुरू असताना दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही जागा भाजपचीच आहे आणि या ठिकाणी भाजपाच निवडून येईल असा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडनं मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील या मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवू इच्छित आहेत. (Lok Sabha Election 2024)
नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघांमध्ये देखील यापेक्षा काही वेगळा प्रकार नसून या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हे पुन्हा एकदा लढण्यासाठी इच्छुक आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच भाजपाकडून देखील ही जागा आपल्याकडे राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून छगन भुजबळ हे देखील या जागेवर आपला दावा ठोकत आहेत.  (Lok Sabha Election 2024)
असे असताना मात्र महायुतीचे (Mahayuti) तिन्ही बडे नेते आज मुंबईमध्ये नसल्याने यावरती तोडगा उद्याच निघू शकतो असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.