भाजपाने ४०० जागा जिंकल्यास मथुरा आणि काशीमध्येही भव्य मंदिरे बांधली जातील, असे आश्वासन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी दिले. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते आणि ते भाजपाने पाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत, असे सरमा यांनी लक्ष्मीनगरमध्ये भाजप उमेदवार हर्ष मल्होत्राच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले.
दिल्लीच्या लोकसभेच्या ७ जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी भाजपाने आपली सर्व ताकद दिल्लीत लावली आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री रोड शो करून आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागत आहेत. यादरम्यान हेमंत बिस्वा सरमा यांनी ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल, असेही आश्वासन दिले.
(हेही वाचा –भगतसिंगांचे साथीदार स्वातंत्र्य सैनिक Sukhdev Thapar )
आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत
पुढे ते म्हणाले की, राम मंदिर बांधण्याचे आश्वासन पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता मोठा विजय झाला पाहिजे, कारण आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यांनी असेही सांगितले की, ‘जेव्हा आमच्याकडे ३०० जागा होत्या तेव्हा आम्ही राम मंदिर बांधले. आता आम्ही मथुरेत कृष्णजन्मभूमीही बनवणार आहोत आणि ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथाचे मंदिर बांधणार आहोत’
हेही पहा –