Lok Sabha Election 2024 : दिल्लीत उष्णतेची लाट; मतदानावर परिणाम होण्याची शक्यता

राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मंगळवार पासून ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे.

145
Maharashtra Assembly Election : उद्योग विभागाच्या आस्थापनांना मतदानाची सुट्टी

लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्यांचे मतदान झाले असून २५ मे आणि १ जून रोजी उर्वरित दोन टप्प्याचे मतदान होणे आहे. या पाच टप्प्यात मतदान कमी झाल्यामुळे आयोगासह राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. अशातच, उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान प्रभावित होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)

देशात उष्णतेची लाट आली आहे. देशाच्या राजधानीसह उत्तर भारतातील जनता उन्हामुळे त्रस्त झाली आहे. शाळांना अचानक सुटी देण्यात आली आहे आणि लोकं घराबाहेर पडण्याऐवजी घरातच राहणे पसंत करीत आहेत. (Lok Sabha Election 2024)

हवामान खात्याने उष्णतेची लाट या आठवड्यात अशीच कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. येत्या शनिवारी २५ मे रोजी ५७ जागांवर निवडणूक होणे आहे. यात दिल्लीतील सात आणि हरियाणातील १० जागांचाही समावेश आहे. दिल्लीतील तापमान ४८ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Milind Deora: उद्धव ठाकरेंमुळे मला पक्ष सोडावा लागला, मिलिंद देवरा यांनी असा आरोप का केला?)

या विभागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्यानुसार या आठवड्यात सूर्य असाच तापणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मंगळवार पासून ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024)

अशात, दिल्ली आणि हरियाणासह आसपासच्या भागात मतदान होणे आहे. आधीच मतदान कमी होत आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष चिंतीत आहेत. यात उन्हाची भर पडली आहे. उन्हामुळे मतदार मतदान करायला बाहेर पडणार नाही, अशी भीती आयोग आणि पक्षांच्या मनात निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.