देशात सध्या लोकसभा निवणुकीचे (loksabha Election 2024) वारे वाहत आहेत. अशातच पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय पक्ष प्रचारावर साधारण किती खर्च करतो हे तुम्हाला माहित आहे का ? तर अंदाजे एक पक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी १५०० ते २००० कोटी रुपये खर्च करतात. एका अहवालात याबाबतची माहिती सांगितली आहे.
(हेही वाचा – Farooq Abdullah यांच्याकडून देखील इंडी आघाडीला धक्का; जम्मू काश्मीर मधून स्वबळावर लढणार)
डिजिटल मीडिया आणि जाहिरातींवर सर्वाधिक खर्च –
सर्व राजकीय पक्ष आपल्या प्रचारासाठी (loksabha Election 2024) वृत्तपत्र किंवा टीव्हीच्या प्रसिद्धीवर सर्वाधिक खर्च करतात. विविध राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराच्या बजेटपैकी ५५ टक्के डिजिटल मीडिया आणि जाहिरातींवर आणि ४५ टक्के इतर निवडणूक प्रचारावर खर्च करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर खर्च करण्यात आलेली रक्कम ही २०१९ च्या निवडणुकीपेक्षा खूप जास्त आहे.
(हेही वाचा – Captain Rohit Sharma : टी-२० विश्वचषकात रोहितच कर्णधार, बीसीसीआय सचिवांची ग्वाही)
‘हे’ पक्ष करणार निवडणुकीवर ज्यादा खर्च
भाजप आणि काँग्रेस पक्ष हे दोन पक्ष (loksabha Election 2024) निवडणूक प्रचारावर जास्त पैसे खर्च करण्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान निवडणूक प्रचारासंदर्भात राजकीय पक्षांची विविध माध्यमांशी चर्चा सुरू आहे. केवळ प्रिंट मीडिया, ज्यामध्ये वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींचा समावेश आहे, त्यांना राजकीय पक्षांकडून ३०० ते ३५० कोटी रुपयांच्या जाहिराती मिळण्याची शक्यता देखील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (loksabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community