Lok Sabha Election 2024: इंडी आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील मल्लिकार्जुन खरगेंचा दावा!

239
Lok Sabha Election 2024: इंडी आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील मल्लिकार्जुन खरगे दावा!

देशभरात १८ व्या लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीची लगबग संपली असून, सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. अशातच मतदानाचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच काही संस्था व माध्यमांतून एक्झिट पोल (election exit poll) द्वारे आकडे समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Congress President Mallikarjun Kharge) यांनी यांनी इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा करतानाच जागांचा आकडाही सांगितला आहे. (Lok Sabha Election 2024)

शनिवारी लोकसभा २०२४ च्या सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले.काँग्रेसचे अध्यक्ष, लोकसभा निवडणुकीमध्ये इंडि आघाडीला २९५ हून अधिका जागांवर विजय मिळेल. असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान आटोपत असतानाच मतमोजणी आणि निकालांनंतरची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला वारिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. ‘आम्ही एक्झिट पोलचं सत्य जनतेसमोर आणू इच्छितो. तसेच २९५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत आहोत. इंडिया आघाडीच्या जागा यापेक्षा कमी येणार नाहीत’. असा दावाही यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

(हेही वाचा – श्रीरंगपटना जामिया मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणासाठी कर्नाटक High Court ची सरकारला नोटीस  )

या बैठकीत इंडी आघाडीत सहभागी असलेल्या विविध पक्षांनी निवडणुकीनंतरच्या संयुक्त रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीला आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते, असे काँग्रेसने म्हटले आहे. मतमोजणीवेळी कोणती खबरदारी घ्यावी यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.