Lok Sabha Election 2024 : महागाई, बेरोजगारी हे कळीचे मुद्दे ?; काय सांगतो सर्व्हे…

Lok Sabha Election 2024 : सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी दोन तृतीयांशपेक्षाही अधिक लोकांनी पूर्वीच्या तुलनेत आता नोकरी मिळणे अधिक कठीण झाले आहे आणि ही संख्या शहरी पुरुषांमध्ये अधिक आहे, असे म्हटले आहे.

171
Lok Sabha Election 2024 : 'या' 16 जणांची टीम वाढवणार मतदानाचा टक्का...कोण आहेत 'ते' 16 जण? वाचा...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिर हा कळीचा मुद्दा ठरेल, अशी चर्चा होत आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेनुसार विरोधी पक्षाने बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा उचलून धरला आहे. बेरोजगारी (unemployment), महागाई (Inflation), भ्रष्टाचार (Corruption) आणि बिघडती आर्थिक परिस्थिती मतदारांसाठी महत्त्वाची आहे आणि याच मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात, असे सीडीएस लोकनीती प्री पोल सर्व्हेमधून (CSDS-Lokniti Pre-Poll Survey) समोर आले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ऐकावं ते नवलचं! मतदानाआधीच दोघांनी केलं वोटिंग)

बेरोजगारीसाठी केंद्र सरकार जबाबदार ?

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी दोन तृतीयांशपेक्षाही अधिक लोकांनी पूर्वीच्या तुलनेत आता नोकरी मिळणे अधिक कठीण झाले आहे आणि ही संख्या शहरी पुरुषांमध्ये अधिक आहे, असे म्हटले आहे. तर तीन चतुर्थांश लोक बेरोजगारीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हणत आहेत. अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा सर्वाधिक परिणाम हा गरीब आणि मध्यमवर्गावर होत आहे. श्रीमंत वर्गावर याचा फारसा परिणाम होत नाही. देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर अहे, असे निर्देशांकांतून दिसत आहे. मतदारांमध्ये महागाईविषयी खदखद जाणवत आहे.

2024 मध्ये बदलली स्थिती

गेल्या 5 वर्षांत महागाई वाढली आहे, असे दोन तृतीयांश लोकांना वाटते. 2019 च्या तुलनेत अधिक लोकांना वाटते की, आता ते आपला खर्च काढल्यानंतर, बचत करू शकतात. मात्र, घर चालवण्यातही अडचणी येत असल्याचे 50 टक्के लोकांना वाटते. बेरोजगारी आणि महागाई हे आगामी निवडणुकीत सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील, असे तब्बल 50 टक्के लोकांना वाटते. 2019 मध्ये सहापैकी केवळ एका व्यक्तीलाच हा मुद्दा महत्त्वाचा वाटत होता. मात्र 2024 मध्ये स्थिती बदलली आहे, असे सर्वेक्षण सांगते. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.